मुंबई - 'चार बॉटल वोडका', 'ब्लू आईझ', 'मखना', 'सनी सनी' यांसारखी सुपरहिट रॅप गाणी बॉलिवूडला देणारा हनी सिंग पुन्हा एकदा आपले 'लोका' हे गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी हनी सिंग लाईमलाईटपासून दूर गेला होता. त्याच्यावर गाण्यांच्या माध्यमातून दारू पिण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, 'लोका' गाण्याच्या प्रमोशन दरम्यान हनी सिंगने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'लोका' गाण्याच्या प्रमोशन दरम्यान हनीने माध्यमांशी संवाद साधला. त्याच्या जून्या गाण्यांप्रमाणेच 'लोका' गाण्यात दारूचा उल्लेख आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, की 'जेव्हा आपण पार्टी करतो तेव्हा दारू ही त्यामध्ये महत्वाची आहे. आपलं सरकार देखील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी लायसन्स देते. जेव्हा सरकार हे लायसन्स देने बंद करेल, तेव्हा मी माझ्या गाण्यातही दारूचा उल्लेख करणार नाही'.
हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेच्या विधानामुळे चर्चेला उधाण
हनी सिंग आपल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या गाण्यात अश्लील शब्दांचा समावेश असतो, असेही आरोप त्याच्यावर झाले आहेत. त्यामुळे तो बराच चर्चेत आला होता.
त्याचे 'लोका' हे गाणे पार्टी सॉन्ग आहे. हनी सिंगसोबतच पंजाबी गायक सिमर कौरने हे गाणं गायलं आहे. तर, भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या या गाण्याला बेन पिटर्सने दिग्दर्शित केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाद्वारे अरुंधती नाग ४० वर्षांनंतर परतणार मराठी सिनेसृष्टीत!