ETV Bharat / sitara

COVID-19 : लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सोहा अली खान 'असा' करते सदुपयोग

author img

By

Published : Apr 25, 2020, 10:02 AM IST

Updated : Apr 25, 2020, 10:08 AM IST

अभिनेत्री सोहा अली खान सध्या तिच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमुळे ती तिच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आली, असे ती म्हणाली आहे. सध्या तिला मिळालेल्या वेळेत ती पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत विविध प्रयोग करताना दिसते. याशिवाय ती तिचे छंद जोपासण्यासाठी देखील वेळ देत असते. या लॉकडाऊनमध्ये ती आपला वेळ सध्या कसा घालवत आहे, याबाबत तिने संवाद साधला आहे.

Here's how Soha Ali Khan is spending time during lockdown
Lockdown : लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सोहा अली खान 'असा' घेत आहे सदुपयोग

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाविश्वातील कलाकार देखील घरीच बसून आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या या वेळेचा हे कलाकार नेमका कसा सदुपयोग करतात, त्याचे विविध व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेत्री सोहा अली खान सध्या तिच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमुळे ती तिच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आली, असे ती म्हणाली आहे. सध्या तिला मिळालेल्या वेळेत ती पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत विविध प्रयोग करताना दिसते. याशिवाय ती तिचे छंद जोपासण्यासाठी देखील वेळ देत असते. या लॉकडाऊनमध्ये ती आपला वेळ सध्या कसा घालवत आहे, याबाबत तिने संवाद साधला आहे.

वाचन -

सोहाने आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितले, की या काळात ती वाचनाला भरपूर वेळ देत आहे. लॉकडाऊनमध्ये मी दररोज किमान १ तास तरी वाचनाला देते. वाचनामुळे मला लिहिण्यासाठीही प्रेरणा मिळते. तुम्हालाही या काळात भरपूर पुस्तकं वाचता येतील, असे ती म्हणाली.

कुटुंबीयांसोबत धमाल-

कुटुंब हे नेहमीच माझ्यासाठी प्राधान्य राहिले आहे. तुमच्या कुटुंबासारखा आधार तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये मी माझ्या कुटुंबाच्या अधिक जवळ आली. एरवी आम्ही आमच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये इतके गुंतलेलो असतो की एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. मात्र, कुणाल देखील आता घरीच असल्याने आम्हाला आमच्या मुलीबरोबर एकत्र भरपूर वेळ मिळतो. इनायाला आम्ही दोघे मिळून चित्रकला, कोडी, रंग देणे, संख्या शिकवणे, यांसारख्या गोष्टी शिकवत आहोत.

खाद्यपदार्थांचे प्रयोग -

या काळात मला कुटुंबीयासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायला मिळत आहेत. पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्यासोबतच मी त्यामध्ये विविध प्रयोग करून पाहत आहे. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची मजा येत आहे.

व्यायामाचे प्रयोग -

लॉकडाऊनमुळे घरातच बसून असल्याने व्यायाम आणि फिटनेसवरही लक्ष देत आहोत. कुणाल मला व्यायामासाठी नेहमी प्रेरणा देतो. आम्ही एकत्र विविध योगासने करत असतो. इनायासाठी देखील आम्ही झुंबा किंवा योगासत्र आयोजित करत असतो. संगीतासोबत योगा करण्यात एक वेगळी मजा येते.

त्वचेची काळजी -

त्वचेच्या काळजी घेण्याबाबत सोहा सांगते, की त्वचेवरील डाग आणि धुळ काढण्यासाठी मी नेहमी फेसमास्क वापरते. विटॅमिन ई चा वापर आपल्या डायटमध्ये असल्यास त्वचा चांगली होते. खाद्यपदार्थांमध्ये बदामाचा वापर करते. तसेच, चेहऱ्यासाठी विटॅमिन सी असलेल्या तेलाचा वापर करत असल्यामुळे त्वचा एकदम चांगली होते.

लॉकडाऊन ही पुर्णत: वाईट वेळ आहे, असे मुळीच नाही. मात्र, आपल्या सुरक्षितेसाठीच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच राहा. आपल्याला विविध कृतींमध्ये गुतवून ठेवा, या वेळेचा सदुपयोग करा, असे सोहाने सांगितले आहे.

Last Updated : Apr 25, 2020, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.