मुंबई - बॉलिवूडची 'ड्रीमगर्ल' अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी योग्य ती काळजी आणि खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. रविवारी (२२ मार्च) देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये, असे हेमा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
- — Hema Malini (@dreamgirlhema) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Hema Malini (@dreamgirlhema) March 21, 2020
">— Hema Malini (@dreamgirlhema) March 21, 2020
कोरोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आपले हात साबणाने धुवून स्वच्छ ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. घरी कुटुंबासोबत वेळ घालवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरसवर नंदेश उमप यांचा हा पोवाडा एकदा ऐकाच!
आपल्या देशातील नागरिकांनी यापूर्वीही बऱ्याच कठीण प्रसंगांना मोठ्या हिमतीने लढा दिला आहे. त्यामुळे कोरोनाशी देखील यशस्वीरित्या लढा देऊन आपण कोरोनाला हरवूया, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. कोणीती जनता कर्फ्यू दरम्यान घराबाहेर पडू नये. जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरून तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल