मुंबई - अभिनयातून राजकारणात उतरलेल्या खासदार हेमा मालिनी यांनी बुधवारी पती अभिनेता धर्मेंद्रसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हेमा यांनी अलीकडेच आपला वाढदिवस पती धर्मेंद्र आणि मुलगी ईशा, अहानासमवेत साजरा केला होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही झलकही त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
-
Time to share a few of my birthday photos with all of you! pic.twitter.com/kwyZBdNvFj
— Hema Malini (@dreamgirlhema) October 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Time to share a few of my birthday photos with all of you! pic.twitter.com/kwyZBdNvFj
— Hema Malini (@dreamgirlhema) October 20, 2020Time to share a few of my birthday photos with all of you! pic.twitter.com/kwyZBdNvFj
— Hema Malini (@dreamgirlhema) October 20, 2020
पोस्ट केलेल्या या फोटोत हेमा आणि धर्मेंद्र निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. दोघांच्या या फोटोला चाहत्यांनी भरपूर कॉमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने ट्विटमध्ये लिहिलंय, “सर्वात सुंदर जोडपे.” तर दुसर्याने लिहिलंय, "लव्हली फोटो. मला तुम्हाला दोघांनाही पुन्हा चित्रपटात बघायचे आहे."
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 'शोले', 'सीता और गीता', 'चरस' आणि 'ड्रीम गर्ल' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ऑगस्ट १९७९ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते.