ETV Bharat / sitara

कोरोना विषाणूच्या लढ्यासाठी हेमा मालिनींची पीएम केअर्समध्ये मदत, इतरांना केले आवाहन - Hema Malini latest news

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करताना दिसतात. त्यांनी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अलिकडेच त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान मदत निधीमध्ये मदत केल्याबाबत माहिती दिली.

कोरोना विषाणूच्या लढ्यासाठी हेमा मालिनींची पीएम केअर्समध्ये मदत, इतरांना केले आवाहन

author img

By

Published : Apr 21, 2020, 2:48 PM IST

मुंबई - जगभरासह भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी कलाविश्वातील अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील पंतप्रधान सहायता निधीमध्ये मदत दिली आहे. तसेच इतरांनाही शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करताना दिसतात. त्यांनी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अलिकडेच त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान मदत निधीमध्ये मदत केल्याबाबत माहिती दिली. तसेच, इतरांनीही आर्थिक मदतीसाठी समोर यावे, असे आवाहन केले आहे.

  • Friends our country is going though a huge war against an invisible enrmy & our PM @narendramodi ji needs the support of the entire country if we have to succeed. If every citizen contributes a small sum to the PM’s relief fund, it will go a long way towards achieving our goal. pic.twitter.com/NEyCzZyXfK

    — Hema Malini (@dreamgirlhema) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'माझा देश माझी ओळख आहे. आज माझ्या देशाला माझी गरज आहे. या कोरोनाच्या लढ्यात मी पीएम केअर्समध्ये छोटे योगदान देत आहे. तुम्ही देखील शक्य होईल ती मदत करा', असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

हेमा मालिनी यांच्यापूर्वी अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, शिल्पा शेट्टी, करिना कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, कार्तिक आर्यन, विकी कौशल, आलिया भट्ट यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी कोरोना लढ्यासाठी आर्थिक मदत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.