मुंबई - कोरोना विषाणूमुळे देशात सध्या संपूर्ण जनता भीतीच्या दहशतीखाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स आणि संपूर्ण वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांनाही या कोरोना विषाणूची शिकार व्हावे लागत आहे. दरम्यान काही डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्याशी करण्यात आलेल्या या गैरवर्तणूक प्रकरणी अभिनेत्री हेमा मालीनी यांनी व्हिडिओ शेअर करुन नाराजी व्यक्त केली आहे.
'डॉक्टरांना त्यांच्याच इमारतीत प्रवेश दिला जात नाही. त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला आहे. हे पाहून मला अत्यंत दु:ख झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत जर कोणी आपले खरे रक्षक असतील, तर ते म्हणजे डॉक्टर्स आहेत. तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या सुरक्षेसाठी ते त्यांच्या जीवाची पर्वा न करता सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती सन्मान दाखवा', असे हेमा यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेमा मालिनींसह इतरही बॉलिवूड कलाकारांनी देखील या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता आमिर खाननेही एक पोस्ट शेअर करुन डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला आहे.
- — Aamir Khan (@aamir_khan) April 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Aamir Khan (@aamir_khan) April 10, 2020
">— Aamir Khan (@aamir_khan) April 10, 2020