अभिनेता रणवीर सिंगचा ८ वर्षापूर्वी रिलीज झालेल्या 'लूटेरा' मधील लूकची आजही चर्चा होत असते. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्टाईलमुळेही तो सर्वांचे लक्ष वेधून घेत राहिला होता. या चित्रपटातील त्याच्या लूकची प्रेरणा हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टारच्या मिश्रणातून घेण्यात आली होती हे तुम्हाला माहिती आहे का?
एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रणवीरने हा खुलासा केला की, 'लूटेरा' या सिनेमातील त्याचा अनोखा लुक जेम्स डीन आणि देव आनंद यांचे एकत्रीकरण आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे यांनी याचा संदर्भ दिल्याचे रणवीर म्हणाला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या चित्रपटातील त्याचा क्लिन शेव लूकमुळे लोकांचे लक्ष वेधले गेल्याचे तो म्हणाला. अनेकांनी त्याच्या या लूकचे कौतुक केले. विशेषतः महिला फॅन्सना हा लूक खूपच पसंत पडल्याचेही त्याने सांगितले होते.
कामाच्या पातळीवर विचार करता रणवीर सिंग कबीर खानच्या आगामी ‘‘ ’83’ या चित्रपटात झळकणार आहे. कोरोना संसर्गामुळे हा चित्रपट गेल्या वर्षीपासून रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण त्याची ऑनस्क्रीन पत्नी रोमी देवची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री दीपिकाने चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याशिवाय, तो दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत ‘सर्कस’ या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्यासोबत मुख्य भूमिकांमध्येही दिसणार आहे.
‘अन्नियान’ या तमिळ चित्रपटाच्या अधिकृत हिंदी रिमेकसाठीही तो सज्ज झाला आहे. मूळ चित्रपटात अभिनेता विक्रम याने मुख्य भूमिका साकारली होती.
हेही वाचा - ‘भूत पोलिस’पोस्टर रिलीज, 'ओटीटी'वर रिलीजची झाली घोषणा!!