सौंदर्यवती अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या रुपाने केवळ बॉलिवूडलाच भुरळ पाडली नाही तर संपूर्ण जगाला घायळ केले होते. आता जरी सुश्मिता चित्रपटांपासून दूर गेली असली तरी तिने एकेकाळी जगात इतिहास रचला होता.
सुश्मिता ही पहिला महिला आहे जिने भारताच्यावतीने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. त्यापूर्वी तिने मिस इंडियाचा किताब जिंकला आणि १८ व्या वर्षी ती मिस युनिव्हर्स बनली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की मिस इंडियाच्या अंतिम फेरीत सुश्मिता आणि ऐश्वर्या राय यांच्या बरोबरी झाली होती. त्यावेळी दोघींचेही पॉईंट्स सारखेच होते आणि विजेती ठरवण्यासाठी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार होते. दोघींनाही प्रश्न विचारण्यात आला आणि परिक्षकांना सुश्मिताचे उत्तर अधिक योग्य वाटले आणि तिला मिस इंडिया घोषित केले. अर्थात त्यानंतर ऐश्वर्यानेही मिस वर्ल्ड किताब जिंकला आणि सुश्मिता मिस युनिव्हर्स बनली.
ऐश्वर्याला विचारण्यात आलेला प्रश्न होता, "तुम्ही तुमच्या पतीमध्ये कोणता गुण शोधाल, तुम्ही द बोल्डच्या रीज फोरेस्टर आणि सांता बार्बराच्या मॅसन कॅपवेल यांच्यापैकी कोणाची निवड कराल?" याच्या उत्तरादाखल ऐश्वर्याने मॅसनची निवड केली आणि म्हणाली, "आम्हा दोघांमध्ये बऱ्याचशा गोष्टी समान आहेत. मॅसन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याचा हजरजबाबीपणा चांगला आहे. जो माझ्या व्यक्तीरेखेशी जुळणारा आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुश्मिता सेनला विचारण्यात आलेला प्रश्न होता, "तुम्ही देशाच्या टेक्स्टाईल हेरीटेजबद्दल काय जाणता ? हे कधीपासून सुरू झाले आणि तुम्हाला काय परिधान करायला आवडेल?" याचे उत्तर देताना सुश्मिता म्हणाली, "मला वाटते हे महात्मा गांधींच्यावेळेस सुरू झाले असावे, याला खूप काळ लोटला आहे. मला भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करायला आवडेल."