मुंबई - आजही आपल्या संगीताने आणि सुमधुर आवाजाने अवघ्या चाहत्यांना वेड लावणाऱ्या किशोर कुमारांना कोण विसरेल. त्यांची गाणी आजही त्यांच्याप्रमाणेच चिरतरुण आहेत. कुशल अभिनेता, संगीतकार, लेखक, निर्माता, संवादलेखक असणाऱ्या किशोर कुमार यांचा वाढदिवस. त्यांच्या 98 व्यावाढदिवसानिमित्त किशोरजींच्या आठवणींना दिलेला उजाळा...
किशोर कुमार यांचे खरे नाव हे कुमार गांगुली होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेश येथील खांडवा येथे झाला. त्यांनी किरकीर्दीची सुरूवात भाऊ अशोक कुमार यांच्याप्रमाणेच बॉंबे टॉकीजपासून केली. 1946 प्रदर्शित झालेल्या 'शिकारी' या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयाची सुरूवात केली. त्यात भाऊ अशोक कुमार प्रमुख भूमिकेत होते. किशोर कुमार हॉलिवूड गायक डॅनी काय यांचे चाहते होते.
लहानपणी होता बेसुर आवाज
किशोर कुमार लहान असताना त्यांचा आवाज अत्यंत बेसुर होता. हा मुलगा मोठा होऊन चांगला गायक होईल याची कोणालाही शाश्वती नव्हती, असे अशोक कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तो लहान असताना अशोक कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी अभिनेते होते. 1948 मध्ये 'जिद्दी' या चित्रपटातून संगीत कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी 10 ते 12 भाषांमध्ये गाणी गायली.
सत्यजित रेंसाठी केले मोफत काम
सत्यजित रे 'चारुलता' या चित्रपटासाठी शूटिंग करताना त्यांना गाण्याचे रेकॉर्डिंग करायचे होते. तेव्हा त्यांनी किशोर कुमारला बोलावले. त्या वेळेस गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर सत्यजीत दांनी जेव्हा किशोरजींना पैसे देऊ केले.तेव्हा त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. एवढेत नाही तर सत्यजीत रे अडचणीत असताना त्यांना मदतही केली. रे 'पाथेर पांचाली' करताना पैसै नसल्याने हा चित्रपट न करण्याचे ठरवले होते. तेव्हा त्यांनी आपल्याकडील 5,000 रुपये मदत केली होती.
खैके पान बनारसवाला
अमिताभ बच्चन यांचे खैके पान बनारसवाला हे गाणे खूप फेमस झाले आहे. 'डॉन' चित्रपटातील हे गाणे आजही तरुणांना वेड लावते. हे गाणे किशोरजींना गायले होते. या गाण्याची आठवण ते सांगतात की, या गाण्याच्या वेळेस आवाजाला फील आणण्यासाठी चार ते पाच वेळा पान खाऊन ते जमिनीवर थुंकले होते. अमितजी आणि किशोरदांची मैत्री जगजाहीर होती. बच्चन यांच्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी आवाज दिला होता.
लव्ह लाईफही होते चर्चेत
किशोर कुमार यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांचे लव्ह लाईफही चर्चेत होते. त्यांची चार लग्ने झाली होती. रूमा गुहा, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर या त्यांच्या पत्नी होत्या. मधुबालाशी लग्न झाल्यावर किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. आणि आपले नाव करीम अब्दुल होते. किशोर कुमार यांच्या घराबाहेर किशोर कुमार सावधान हा बोर्ड लावला होता. किशोर कुमार हे व्हर्सटाईल सिंगर होते. ते मुलींच्या आवाजातही गाणे गात. 'एक लडकी भिगी भागी सी' हे गाणे त्यांनीच गायले होते.
किशोर कुमार यांची काही हिट गाणी
- दिल क्या करे - (ज्युली)
- मेने सपनो की रानी (आराधना )
- मेरे मेहबूब कयामत होगी - (मि. एक्स ईन बॉम्बे)
- एक लडकी भिगी भागी सी - (चलती का नाम गाडी)
- ओ रुप तेरा मस्ताना - (आाराधना)
- जय जय शिव शंकर - (आप की कसम)
- जिंदगी सफर है सुहाना - (अंदाज)
- एक अजनबी हसीना से - (अजनबी)
- मेरे सामने वाली खिडकी मै -(पडोसन)
- तेरे जैसा यार कहा - ( याराना)
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र