ETV Bharat / sitara

"मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ..." हंसल मेहतांना सांगितला बच्चन भेटीचा रंजक किस्सा - Amitabh Bachchan

तुमचे फेवरेट सेलेब्रेटी कसे भेटले हा ट्रेंड सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याला प्रतिसाद देत मेहता यांनी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा सांगितला आहे.

बच्चन भेटीचा रंजक किस्सा
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:47 PM IST

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा त्यांच्या करियरच्या सुरूवातीच्या काळातील आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर जोरदार पसरलाय. तुमचे फेवरेट सेलेब्रेटी कसे भेटले हा ट्रेंड सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याला प्रतिसाद देत मेहता यांनी हा किस्सा लिहिलाय.

  • What's your most memorable celebrity encounter? Quote and let us know :)

    — Sukhada (@appadappajappa) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मेहता यांनी लिहिलंय,"मी माझ्या करियरला नुकतीच सुरूवात केली होती आणि एक पत्र मी बच्चन साहेबांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास माझी आई म्हणाली की तुला अमिताभचा फोन आलाय. त्यावेळी माझा सहाय्यक एडिटर अमिताभ वर्मा होता."

  • I'd just begun my career and had dropped off a letter to Mr. Bachchan's bungalow (with security). The next morning at around 8 am my mother comes to the room and says that there is a call for me from Amitabh. My assistant editor at that time was Amitabh Verma.

    — Hansal Mehta (@mehtahansal) August 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हंसल मेहता पुढे लिहितात, "मी फोन उचलला आणि म्हटले बोल अमिताभ, त्याच्या उत्तरादाखल समोरुन आवाज झाला, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ."

दरम्यान दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनीदेखील अमिताभ यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा लिहिला आहे. हा किस्सा अभिषेक बच्चनच्या वाढदिवस पार्टीचा आहे. यादिवशी संपूर्ण संध्याकाळ त्यांनी केवळ अमिताभला निरखण्यात घालवली होती.

  • I was 8, briefly in the same school as @juniorbachchan, and was lucky enough to get invited to his birthday party. Spent the whole evening looking for HIM. HE came to the party late, straight from shoot, probably Mard. I remember his boots. He nodded at me. Made my life... https://t.co/J2DtOtArdS

    — Vikramaditya Motwane (@VikramMotwane) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोटवानी लिहितात, " त्यावेळी मी ८ वर्षांचा होतो. अभिषेकच्या शाळेतच शिकत होतो. सुदैवाने त्याने मला त्याच्या वाढदिवस पार्टीला बोलवले. त्या संध्याकाळी मी संपूर्ण वेळ अमिताभ यांना पाहण्यात घालवला. ते पार्टीला मर्दच्या शूटींगमधून थेट आले होते. मला त्यांचे बूट आठवतात. ते माझ्याशी बोलले. माझे आयुष्य घडवलं..."

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ९० च्या काळात करियरला सुरूवात केली. सिमरन, ओमर्ता, दस कहानियाँ आणि राख या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विक्रमादित्य मोटवानी हे लुटेरा, उडान आणि भावेश जोशी सुपरहिरो या चित्रपटासाठी ओळखले जातात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.