मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या सोशल मीडियावरील नवीन पोस्टमध्ये प्रेग्नसीदरम्यानची एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणापूर्वीचा एक स्वत: चा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती खुर्चीवर बसलेली असून हातात एक वाटी धरलेली दिसत आहे, या वाटीमध्ये खाण्यासाठी काहीतरी आहे.
![Anushka Sharma](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9907985_anu.jpg)
या फोटोला कॅप्शन देत अनुष्काने लिहिलंय, "जुनी गोष्टी, तेव्हा मी अशी बसून खाऊ शकत होते. आता मी अशी बसू शकत नाही पण मनात येईल ते खाऊ शकते."
हेही वाचा -नेटफ्लिक्सच्या ‘अॅनाटॉमी ऑफ ए स्कॅन्डल’ नाओमी स्कॉट
जानेवारी २०२१ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.
हेही वाचा -माझ्याकडे सेलफोन किंवा कंप्यूटर नाही - ऑस्कर विजेता क्रिस्टोफर वॉकेन