ETV Bharat / sitara

'बुर्ज खलिफा' गाण्यासाठी कियाराने केले वाळवंटात अनवाणी पायाने डान्स - अक्षय कुमार

कियारा अडवाणीने बुर्ज खलिफा गाण्याच्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा तिच्या इंस्टाग्राम पेजवर एका फोटोसह शेअर केला आहे. या फोटोत ती सोनेरी रंगाचा मास्क घालून दिसत आहे. बुर्ज खलिफा गाण्याचे चित्रीकरण शुटींगदरम्यानच्या सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असल्याचे, फोटोसह दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

'बुर्ज खलिफा' गाण्यासाठी कियाराने केले वाळवंटात अनवाणी पायाने डान्स

author img

By

Published : Oct 18, 2020, 12:30 PM IST

नवी दिल्ली - कबीर सिंह आणि गुड न्युजसारख्या चित्रपटांमधून नावारुपास आलेली बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने थोड्याच काळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती येत्या काळात अक्षय कुमारबरोबर लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील एक गाणे बुर्ज खलिफाच्या शुटींगदरम्यानचा एक रंजक किस्सा तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

कियाराने या गाण्याच्या शुटींगबाबतचा हा किस्सा तिच्या इंस्टाग्राम पेजवर एका फोटोसह शेअर केला आहे. या फोटोत ती सोनेरी रंगाच्या कपड्यांसह मॅचिंग मास्क घालून दिसत आहे. बुर्ज खलिफा गाण्याचे चित्रीकरण शुटींगदरम्यानच्या सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असल्याचे, फोटोसह दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

फॅन्सी आउटफिटसह थंड आणि बर्फाळ अशा फॅन्सी लोकेशनवर शिफॉनची साडी घालून फिरण्यासोबत डान्स करणं खरच अवघड आहे. मात्र, वाळवंटातील गरम वाळूवर अनवाणी पायाने डान्स करणं हे देखील अवघड असल्याचे तिने म्हटले आहे.

सध्या लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमध्ये कियारा अगदी ग्लॅमरस अंदाजात 'गर्ल नेक्स डोअर' च्या अवतारात दिसत आहे. हा चित्रपट तामिळ चित्रपट मुनि २ :कंचनाचा रिमेक असून याचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स याने केले आहे.

हेही वाचा - अभिनेता अनिल कपूर अ‍ॅकिलिस टेंडन आजाराने त्रस्त, सोशल मीडियावर दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.