मुंबई - २०१८ मध्ये 'मनमर्जिया' चित्रपटापासून अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र त्याने अलिकडेच कोलकात्यात 'बॉब विश्वास'च्या शूटींगला सुरूवात करत चाहत्यांना खूश करुन सोडले होते. याच्या शूटींगचे पहिले शेड्यूल यशस्वी पार पडले आहे.
शूटींगच्या पहिल्या दिवसापासून याचे अपडेट्स अभिषेक चाहत्यांना देत होता. त्यासोबतच काही फोटो आमि व्हिडिओही शेअर करीत होता. अभिषेकने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या होत्या.
'बॉब विश्वास'चे दिग्दर्शन नवोदित दीया घोष करत आहे. याची कथा सुजॉय घोष यानी लिहिलिय. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान करत आहे.
-
First shooting schedule concludes... #BobBiswas - #SRK's new production... Stars #AbhishekBachchan and #ChitrangdaSingh... Directed by Diya Annapurna Ghosh... Produced by Gauri Khan, Sujoy Ghosh and Gaurav Verma. pic.twitter.com/On0StwbZ0k
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">First shooting schedule concludes... #BobBiswas - #SRK's new production... Stars #AbhishekBachchan and #ChitrangdaSingh... Directed by Diya Annapurna Ghosh... Produced by Gauri Khan, Sujoy Ghosh and Gaurav Verma. pic.twitter.com/On0StwbZ0k
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2020First shooting schedule concludes... #BobBiswas - #SRK's new production... Stars #AbhishekBachchan and #ChitrangdaSingh... Directed by Diya Annapurna Ghosh... Produced by Gauri Khan, Sujoy Ghosh and Gaurav Verma. pic.twitter.com/On0StwbZ0k
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2020
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी बॉब विश्वासच्या शूटींगचे अपडेट्स ट्विटरवर दिलेत. त्यांनी पहिले शेड्यूल पार पडल्याचे म्हटले आहे. अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. गौरी खान, सुजय घोष आणि गौरव वर्मा यांची ही संयुक्त निर्मिती आहे.