मुंबई - बॉलिवूड भाईजान पुन्हा एकदा चित्रपटगृहं गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. दबंगच्या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरणंही पूर्ण झालं आहे.
अखेर महेश्वरमधील चित्रीकरण पूर्ण, असे कॅप्शन देत सलमानने सेटवरील आपला एक फोटो शेअर केला आहे. मध्यप्रदेशमध्ये महेश्वर येथे हे चित्रीकरण करण्यात आलं आहे. चित्रपटाचं शीर्षक गीत हूड हूड दबंगदेखील याच ठिकाणी शूट करण्यात आलं. आता पुढील चित्रीकरणासाठी भाईजान कोठे रवाना होणार याकडेच चाहत्यांचे लक्ष आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे वॉन्टेडनंतर तब्बल १० वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र झळकणार आहे. दरम्यान चुलबूल पांडे पुन्हा एकदा चाहत्यांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.