मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. भाईजानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. भारत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींची कमाई केली आहे.
याआधी सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटानं पहिल्याच दिवशी ४०.३५ कोटींची कमाई केली होती. आता 'भारत'नं या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडले आहेत. बुधवारी झालेल्या भारत आणि आफ्रिकेच्या मॅचचाही चित्रपटाला फारसा फटका बसलेला दिसत नाही.
आपल्या चाहत्यांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात भाईजान नेहमीप्रमाणेच यावेळीही यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवशीची ही कमाई पाहता हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार करेल, यात काही शंका नाही. अशात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते नवे रेकॉर्ड बनवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.