ETV Bharat / sitara

प्रसिध्द दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण - 'पोन्नीयन सेल्वन -1' चित्रपटाचे शूटिंग सुरू

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम अडचणीत आले आहेत. पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) च्या तक्रारीवरून चित्रपट दिग्दर्शकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणिरत्नम यांच्या 'पोन्नीयन सेल्वन -1' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि शूटिंग दरम्यान घोड्याच्या मृत्यूबद्दल त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक मणिरत्नम
प्रसिध्द दिग्दर्शक मणिरत्नम
author img

By

Published : Sep 3, 2021, 3:40 PM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम अडचणीत आले आहेत. पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) च्या तक्रारीवरून चित्रपट दिग्दर्शकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणिरत्नम यांच्या 'पोन्नीयन सेल्वन -1' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. हैदराबादमध्ये शुटिंगच्या दरम्यान घोड्याचा अपघाती मृत्यू झाला होता. याला दिग्दर्शक जबाबदार असल्याचे ठरवून पेटा अंतर्गत त्यांच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मीडियातील बातमीनुसार, पेटाने मणिरत्नम यांचे फिल्म प्रॉडक्शन हाऊस मद्रास टॉकीज आणि घोड्याच्या मालकाविरोधात अब्दुल्लापुरमेट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर एनिमल वेलफेअर बोर्डाने मणिरत्नम यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मणिरत्नम यांच्या 'पोन्नीयन सेल्वन -1' चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमध्ये सुरू असताना ही घटना घडली. ताज्या अहवालानुसार, क्रू हैदराबादमध्ये शूटिंग करत असताना ही घटना घडली. सांगितले जात आहे की शूटिंग दरम्यान डोक्याला धडक लागल्याने घोड्याचा मृत्यू झाला. या नाट्यमय चित्रपटात अनेक घोड्यांचा वापर केला जात आहे.

मणिरत्नम यांच्या 'पोनरीयन सेलवान' चित्रपटाचा पहिला भाग देशाच्या विविध भागांमध्ये चित्रित केला जात आहे. तमिळ सुपरस्टार विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेत्री त्रिशा, जयम रवी आणि कार्ती सारखे कलाकार चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा - सिद्धार्थ शुक्लाच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूची माहिती अस्पष्ट; 'या' परीक्षणानंतर कळू शकणार कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.