ETV Bharat / sitara

बलात्काराचा प्रयत्न केल्याचा 'केआरके'वर मॉडेलचा आरोप, एफआयआर दाखल - कमाल आर खान

कमाल आर खानच्या विरोधात एका मॉडेलने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मॉडेलने गेल्या जून महिन्यातच पोलिसात तक्रार दिली होती. सध्या केआरके दुबईत असून त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

FIR filed against KRK for attempted rape
बलात्काराचा प्रयत्न केल्याचा 'केआरके'वर आरोप, एफआयआर दाखल
author img

By

Published : Jul 27, 2021, 5:16 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा स्वयंघोषित समिक्षक कमाल आर खान सतत वादाच्या भोवऱ्यात असतो. आतापर्यंत त्याने बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत पंगा घेतलाय. आता मात्र तो अडचणी येण्याची शक्यता दुणावली आहे. या केआरकेच्या विरोधात एका मॉडेलने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मॉडेलने गेल्या जून महिन्यातच पोलिसात तक्रार दिली होती. मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये २६जून २०२१ रोजी केआरकेविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या केआरके दुबईत असून त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

FIR filed against KRK for attempted rape
बलात्काराचा प्रयत्न केल्याचा 'केआरके'वर आरोप, एफआयआर दाखल

केआरकेने अलिकडेच सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाबद्दलचा रिव्ह्यू दिला होता. यावेळी त्याने सलमानला डिवचले होते. यानंतर काही दिवसांत सलमानने केआरकेवर मानहानी दावा ठोकला होता. 'राधे'चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकल्याचे केआरकेने म्हटले होते. मात्र सलमानच्या वकीलांनी याबाबत खुलासा करत, मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यूचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. केआरके सलमानच्या बीइंग ह्युमन ब्रँडला सतत बदनाम करण्याचे प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याच्याविरोधात मानहानी दावा ठोकण्यात आल्याचे वकीलाने स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी केआरके पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी २५लाखांची मागणी करत असतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांना तो ब्लॅकमेल करत असल्याचेही आरोप त्याच्यावर करण्यात आले होते.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष मुलाखत - अभिनेता श्रेयस तळपदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.