मुंबई - २०१८मध्ये रिलीज झालेला सुपरस्टार यशचा 'केजीएफ' हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता आणि त्याच्या रॉकी या पात्राने देशभर दहशत निर्माण केली होती.
'केजीएफ 2' हा वर्ष २०२० मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये यश पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.
१६ जुलै २०२१ रोजी 'केजीएफ 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट थिएटरमध्ये सर्वत्र झळकेल. सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा झाली असून ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन ही बातमी दिली आहे.
![-release-date-of-kgf-2-has-been-decided](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10427147_kgf1.jpg)
केजीएफ: चॅप्टर १ हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला बेस्ट अॅक्शन आणि स्पेशल इफेक्टसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
![-release-date-of-kgf-2-has-been-decided](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10427147_kgf.jpg)
केजीएफः चॅप्टर 2 मध्ये संजय दत्त आणि रवीना टंडन एक शक्तिशाली व्यक्तिरेखा म्हणून काम करीत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'केजीएफ २' मध्ये आलेल्या असंख्य 'विघ्नां'चा यशने केला पहिल्यांदाच खुलासा