ETV Bharat / sitara

मोदींकडून 20 लाख कोटींची घोषणा; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस, दिग्गज कलाकारही सहभागी - pm modi lockdown financial package

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतसाठी 20 लाख कोटींच्या प‌ॅकेजची घोषणा केली. मोदी यांच्या या घोषणेनंतर अनेक दिग्गज कलाकारांनी मोदी यांच्यावर ट्विटद्वारे निशाना साधला आहे.

Actors respond to pm modi financial package via tweet
मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक प‌ॅकेजवर कलाकारांकडून ट्विटद्वारे प्रत्युत्तर
author img

By

Published : May 13, 2020, 12:58 PM IST

Updated : May 13, 2020, 2:24 PM IST

मुंबई - मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री देशवासियांना संबोधित केले. ज्यात त्यांनी 20 लाख कोटींचे नवीन आर्थिक प‌ॅकेज जाहीर केले. तसेच लॉकडाऊनचा चौथा टप्पा देशात असेल, याचे स्पष्ट संकेत दिले. मोदी यांच्या या घोषणेनंतर अनेक दिग्गज कलाकारांनी मोदी यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी प्रवासी, मजूर यांच्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा... कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी

प्रसिद्ध संगीतकार विशाल दादलानी यांनी ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. 'आता कोणी तरी म्हटले की, २० लाख कोटींचे प्रोत्साहन पॅकेज देण्यात येईल. गरिबांचे काहीच महत्व नाही का? मला अद्याप परप्रांतीय कामगारांविषयी कोणतीही चर्चा होताना दिसत नाहीये, तुम्हाला?' असे ट्विट दादलानी यांनी केले.

विशाल दादलानी यांचे पहिले ट्विट...

विशाल दादलानी यांनी यानंतर आणखी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिले की, 'जो माणूस आपल्या कुटुंबासमवेत आपल्या स्वतः पायी शहर ते गाव जाण्याचा निश्चय करतो, त्याहून जास्त आतनिर्भर को कोण आहे? कि, त्यांतचे आत्मबल हे त्यांची मजबूरी आणि लाचारी आहे ?' असे ट्विट विशाल यांनी केले आहे.

विशाल दादलानी यांचे दुसरे ट्विट...

विशाल यांचे दुसरे ट्विट मोदींच्या आत्मनिर्भर भारत यावर कटाक्ष टाकणारे आहे.

अभिनेता आणि राजकारणी प्रकाश राज यांनीही मोदी यांच्या कार्यक्रमावर तिरकस टिप्पणी केली आहे. ज्यात त्यांनी 'आजकाल रात्री आठ वाजता रिकामी भांडी अधिक वाजतात. #JustAssking' असे ट्विट केले आहे.

प्रकाश राज यांचे ट्विट...

प्रकाश राज यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरस होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

'थप्पड' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये एका दारूच्या बाटलीचे छायाचित्र पोस्ट केले. ज्यावर 'रात्री आठ वाजता' असे लिहिलेले आहे. त्यात सिन्हा यांनी 'हे मला कोणी आणि का पाठवले ?' असे ट्विट केले आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे ट्विट...

दक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर हीने एक ट्विट केले. त्यात तिने मोदी यांना पंधरा लाख रुपयाची आठवण करुन दिली आहे. 'नरेंद्र मोदीजी तुम्ही 2014 मध्ये वचन दिल्याप्रमाणे, लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये पाठवण्याची ही चांगली संधी यापेक्षा दुसरी असूच शकत नाही. सध्याच्या संकटावेळी हीच सर्वात मोठी मदत होईल, असे तुम्हाला वाटत नाही का?' असे ट्विट तीने केले आहे.

अभिनेत्री खुशबू सुंदर यांचे ट्विट...

कलाकारांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. तसेच अनेकांनी या कलाकारांच्या ट्विटचे समर्थन केले आहे.

हेही वाचा... ...तर गरजूंच्या खात्यात किमान ७,५०० रुपये टाका; पंतप्रधानांच्या भाषणावर थोरातांची प्रतिक्रिया

Last Updated : May 13, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.