ETV Bharat / sitara

अमिताभचे मत जाणून घेण्यासाठी शेतकरी आंदोलक दिल्लीहून आले मुंबईला - अमिताभ बच्चनच्या भेटीला दिल्लीतील शेतकरी

कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीत बसले आहेत. या आंदोलनाविषयी बॉलिवूड सेलेब्रिटींनी चकार शब्द काढलेला नाही. अमिताभ यांच्यासह दिग्गज कलाकारांची या आंदोलनाबद्दल काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली खास बातचीत.

Farmers' activists
शेतकरी आंदोलक
author img

By

Published : Jan 4, 2021, 7:29 PM IST

मुंबई - कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेली ३९ दिवस धरणे देऊन बसले आहेत. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. इतरवेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ट्विटर वापरणाऱ्या सेलेब्रिटींना यावर चकार शब्द काढलेला नाही. या आंदोलनाबद्दल त्यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही शेतकरी दिल्लीहून मुंबई आले आहेत. त्यांना अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर आणि कंगना रणौत यांची भेट घ्यायची आहे.

शेतकरी आंदोलक दिल्लीहून आले मुंबईला

सेलेब्रिटींना भेटण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांना निवेदन दिले असून या लोकांची भेट घेतल्या शिवाय परत जाणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोहित शर्मा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या बंगल्या भोवती रेंगाळणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मोहित शर्मा आणि प्रकाश श्रीवास्तव यांना जुहू पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. बच्चन शुटिंगमध्ये व्यग्र असल्याचे त्यांना सांगण्यात आलंय.

हेही वाचा - रिचा चढ्ढाचा "मॅडम चीफ मिनीस्टर" चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.