मुंबई - मुंबईतील ड्राईव्ह-थ्रू सेंटरमध्ये कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस कसा मिळाला हे सांगून अभिनेता फरहान अख्तरने ट्रोलर्सच्या टीकेला उत्तर दिले आहे.
८ मे रोजी फरहानने ट्विटरवर मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ड्रायव्ह-थ्रूद्वारे कोविड लसीचा पहिला डोस घेतल्याचे शेअर केले होते. त्यानंतर ट्रोलर्सनी त्याच्यावर टीका करायला सुरूवात केली. ड्राइव्ह-इनमध्ये वृध्दांसाठी लसीकरणसुरू असताना फरहानला लस कशी देण्यात आली अशी टीका सुरू झाली होती.
ड्राइव्ह-इनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात असताना ४७ वय असलेल्या फरहान अख्तरला लस कशी मिळाली असा दावा नेटिझन्सनी केल्यानंतर त्याने खुलासा करण्याची मागणी करण्यात येत होती. फरहानला प्रश्न विचारत एका युजरने लिहिले, ''आणखी एक सेलेब्रिटीने ६० वर्षावरील नागरिकांसाठी राखीव असलेल्या ड्राईव्ह इनमध्ये लस घेतली. जर तो ६० वर्षावरील असेल तर ते आम्हाला माहिती नाही. किंवा त्याने आपले वजन वापरून लस घेतली असेल.''
-
The drive in is for 45 + .. now do something constructive for society with your time like losing your phone. https://t.co/zLgyhhtQIO
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The drive in is for 45 + .. now do something constructive for society with your time like losing your phone. https://t.co/zLgyhhtQIO
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 10, 2021The drive in is for 45 + .. now do something constructive for society with your time like losing your phone. https://t.co/zLgyhhtQIO
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 10, 2021
त्याला उत्तर देताना फरहान म्हणाला, "ड्राइव्ह-इनमध्ये लसीकरण ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. फोनवर वेळ घालवण्यापेक्षा समजासाठी काही तरी काम करुन वेळेचा उपयोग करा.''
दुसर्या वापरकर्त्याने फरहानला स्लॉट बुकिंगचा स्क्रीनशॉट दाखवण्यास सांगितले, "जर हे सत्य असेल तर फरहान अख्तरने स्पष्टीकरण द्यावे, बुकिंग स्क्रीनशॉट दाखवावा."
यावर फरहानने आपल्या स्लॉट बुकिंगचा स्क्रिन शॉट शेअर करुन ट्रोलर्सचे तोंड बंद केले.
-
Thank you for @anubhavdps asking the logical question. This deserves a reply. Here you go .. #staysafe #staysane https://t.co/VDpm3ERZor pic.twitter.com/wEs2GMjsUD
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for @anubhavdps asking the logical question. This deserves a reply. Here you go .. #staysafe #staysane https://t.co/VDpm3ERZor pic.twitter.com/wEs2GMjsUD
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 11, 2021Thank you for @anubhavdps asking the logical question. This deserves a reply. Here you go .. #staysafe #staysane https://t.co/VDpm3ERZor pic.twitter.com/wEs2GMjsUD
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 11, 2021
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ४ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क जवळ बहु-मजली कोहिनूर पार्किंग लॉट येथे महाराष्ट्रातील पहिले 'ड्राईव्ह-इन' लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ड्राइव्ह-इन सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी, विशेषत: सक्षम, गर्भवती माता आणि इतर नागरिकांसाठी आहे ज्यांना लसीकरण केंद्रांवर रांगेत उभा राहून प्रतीक्षा करता येत नाही, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले.