ETV Bharat / sitara

फरहान अख्तरने दाखवली तुफानच्या मेहनतीची झलक - Toofan

फरहान अख्तर राकेश ओमप्रकाश मेहराच्या यांच्या तुफान चित्रपटात काम करीत आहे. याततो बॉक्सरची भूमिका करतोय. यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे.

फरहान अख्तर
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:11 PM IST

मुंबई - अभिनेता फरहान अख्तर मिळालेली व्यक्तीरेखा जीवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत करीत असतो. याचा प्रत्यय आपल्याला २०१३ मध्ये आलेल्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातून आला होता. मिल्खा सिंगच्या व्यक्तीरेखेसाठी त्याने धावण्याचा प्रचंड सराव केला होता. आताही तो असाच घाम गाळतोय.

सध्या तो राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शन करीत असलेल्या 'तुफान' चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारत आहे. यासाठी तो बॉक्सींगचे प्रशिक्षण घेत आहे.

फरहानने इन्स्टाग्रामवर बॉक्सींग करीत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आपण कशी मेहनत घेत असल्याचे सांगतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "जोपर्यंत थांब असे ट्रेनर म्हणत नाही, तोपर्यंत थांबायचे नसते..."

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'तुफान' चित्रपटासोबतच फरहान अख्तर शोनाली बोस यांच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटात काम करीत आहे. यात तो 'दिल धडकने दो' चित्रपटाची सहकलाकार प्रियंका चोप्रासोबत काम करीत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.