ETV Bharat / sitara

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा २१ फेब्रुवारी रोजी होणार विवाह - Farhan Akhtar court marriage

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. आता हे जोडपे पुढील महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर
author img

By

Published : Jan 14, 2022, 7:47 PM IST

मुंबई - विकी कौशल आणि कॅटरिना कैफनंतर आता बॉलिवूडचे आणखी एक प्रसिद्ध जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि त्याची मैत्रीण शिबानी दांडेकर यांच्याबद्दल. या वर्षी अनेक स्टार जोडपी बोहल्यावर चढायची तयारी करीत आहेत. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे नाव टॉप लिस्टमध्ये आहे. फरहान आणि शिबानी यांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान-शिबानी पुढच्या महिन्यात 21 फेब्रुवारीला मुंबईत लग्न करणार आहेत. हे जोडपे त्यांच्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे. फरहान आणि शिबानी एकमेकांना खूप दिवसांपासून (3 वर्षे) डेट करत आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न असेल, मात्र अद्याप लग्नाच्या बातमीवर दोघांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

फरहान अख्तर 9 जानेवारीला त्याच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत लग्नाची घोषणा करणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात होतं. याआधी बातमी आली होती की हे जोडपे मार्च 2022 मध्ये लग्न करणार आहेत.

फरहान-शिबानीनेही रिलेशनशिपदरम्यानचे त्यांचे सुंदर क्षण चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या जी ले जरा या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जी ले जरा हा चित्रपट फरहानच्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाची महिला आवृत्ती आहे. मूळ चित्रपटात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

2000 मध्ये फरहान अख्तरने हेअरस्टायलिस्ट अधुनासोबत लग्न केले होते. 17 वर्षांनंतर दोघांनी 2017 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर फरहान मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत आहे.

हेही वाचा - कपिल शर्मा बायोपिक 'फनकार'मधून उलगडणार कॉमेडी किंगची अनटोल्ड स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.