ETV Bharat / sitara

फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर या जोडीचा ‘तूफान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली! - मृणाल ठाकूर

प्रदर्शन पुढे ढकललेल्या फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर अभिनित ‘तूफान’ च्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून येत्या १६ जुलैला त्याचा ग्लोबल प्रीमिअर अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे.

Toofan' has a release date!
‘तूफान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!
author img

By

Published : Jun 18, 2021, 4:57 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडले. लॉकडाऊनमुळे सुरु झालेली चित्रपटगृहे पुन्हा बंद झाली आणि अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले. यावर उपाय म्हणून काही निर्मात्यांनी ओटीटी वर चित्रपट रिलीज करण्याचा पर्याय शोधला. एकदा प्रदर्शन पुढे ढकललेल्या फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर अभिनित ‘तूफान’ च्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून येत्या १६ जुलै ला त्याचा ग्लोबल प्रीमिअर अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे. रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे, अमेझॉन प्राइम व्हिडीओ सादर करत असलेल्या या सिनेमात परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Toofan' has a release date!
‘तूफान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

‘भाग मिल्खा भाग’ या यशस्वी चित्रपटानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ’तूफान’ मधून एक दमदार ‘पंच’ पुन्हा एकदा घेऊन आली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या अजीज अली चा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते.

‘तूफान’ मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.

बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा, राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला, ‘तूफान’ हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. या चित्रपटामध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Toofan' has a release date!
‘तूफान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

भारत आणि जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना एक अद्वितीय आणि प्रेरणादायी प्रवासाची अनुभूती देणारा ‘तूफान’ हा अत्यंत रंजक सिनेमा १६ जुलै पासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

हेही वाचा - नवीन पर्वात आमची जबाबदारी सांभाळून खूप धमाल करू - आर्या आंबेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.