मुंबई - स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी (एसएमए) नावाच्या दुर्मिळ आनुवंशिक विकाराने ग्रस्त असलेल्या मदतीसाठी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खान पुठे आल्या आहेत. त्याच्या इलाजासाठी आवश्यक 16 कोटी रुपयांची मदत त्यांनी उभारली आहे. या आजाराने हरियाणातील रहिवासी प्रवीण मदन यांचा मुलगा अयांशच्या घशाचे आणि फुफ्फुसांचे स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की तो बोलू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही किंवा काहीही गिळू शकत नाही.
- — TheFarahKhan (@TheFarahKhan) September 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— TheFarahKhan (@TheFarahKhan) September 10, 2021
">— TheFarahKhan (@TheFarahKhan) September 10, 2021
आयंश या मुलासाठी आवश्यक आहे 16 कोटीचे इंजेक्शन
गुरूग्रामच्या या निष्पाप आयंश या मुलावर उपचार होण्यासाठी आवश्यक आहे झोलगेन्स्मा हे जगातील सर्वात महागडे औषध. फराह खान यांनी यासाठी मोठे योगदान दिले आहे. फराह खान आणि दीपिका पदुकोण कौन बनेगा करोडपती शोमध्ये गेस्ट म्हणून आल्या होत्या . त्यावेळी ही रक्कम जिंकल्यानंतर याचा उपयोग कसा करणार असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी फराह यांना विचारला होता. त्यावेळी अयांश या मुलाच्या आजाराची व्यथा फराह यांनी सांगितली व या स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी (एसएमए)च्या इलाजासाठी आवश्यक 16 कोटी रक्कम उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यावेळी अमिताभ यांनीही आपण यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर फराह यांनी आपल्या सोशल मीडियावरुन लोकांना मदतीचे आवाहन केले होते.
-
Cm on we can do this!! No amount is too little.. ♥️🙏🏼 pic.twitter.com/wdEozwi9OS
— TheFarahKhan (@TheFarahKhan) September 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cm on we can do this!! No amount is too little.. ♥️🙏🏼 pic.twitter.com/wdEozwi9OS
— TheFarahKhan (@TheFarahKhan) September 23, 2021Cm on we can do this!! No amount is too little.. ♥️🙏🏼 pic.twitter.com/wdEozwi9OS
— TheFarahKhan (@TheFarahKhan) September 23, 2021
फराह खान यांनी उभी केली 16 कोटींची मदत
फराहच्या या आवाहनाला संवेदनशील लोकांनी प्रतिसाद दिला आणि एक पोस्ट लिहून त्यांनी 16 कोटी ही रक्कम जमा झाली असल्याचे जाहीर केले. यावेळी फराह यांनी अमिताभ आणि 'कौन बनेगा करोडपती' शोचे आभारही मानले.
काय आहे हा आजार?
ज्या मुलांच्यात प्रोटीन बनवण्याचा जनूके असत नाही अशा मुलांच्यामध्ये हा विकार वाढीस लागतो. परिणामी मज्जातंतू आणि स्नायूंना बळकटी देण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या रोगाची लक्षणे घेऊन जन्माला आलेली मुले जास्तीत जास्त 2 वर्षे जगू शकतात. त्यावर योग्य उपचार केले गेले तर मुलाला नवीन जीवन मिळू शकते.
हेही वाचा - Cruise Drug Case : एनसीबी कारवाईतील पंच फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खुलासा