ETV Bharat / sitara

नव्या सिनेमाची घोषणा विचारणाऱ्या फॅनला शाहरुखने दिले मिश्किल उत्तर - शाहरुखचा चाहत्यांशी संवाद

अभिनेता शाहरुख खानने बुधवारी दुपारी चाहत्यांशी संवाद साधला. तासभर फॅन्सच्या असंख्य प्रश्नांना त्याने मिश्किल उत्तरे दिली.

Shahrukh Khan
अभिनेता शाहरुख खान
author img

By

Published : Mar 31, 2021, 6:54 PM IST

मुंबई - आगामी चित्रपटाबद्दल विचारणाऱ्या एका चाहत्याला शाहरुख खानने एकदम हटके उत्तर दिलंय. बुधवारी त्याने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तो वेगळ्याच मुडमध्ये दिसत होता.

बुधवारी दुपारी शाहरुखने आपल्या फॅन्सना ट्विटरवरुन आमंत्रण दिले होते. त्याने लिहिले, "मी आणखी काही करण्यापेक्षा 15 मिनिटांचा वेळ घ्या! आपल्यासोबत विचार मांडत आहे, त्वरा करा.'' असे म्हणत त्याने 'आस्क एसआरके' हा हॅशटॅग वापरला होता.

लवकरच, चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी शाहरुख खानच्या टाईमलाईनवर पूर आला. परिणामी, #AskSRK हॅशटॅगने ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात केली. गप्पांदरम्यान एसआरकेचा विलक्षण स्वभाव पाहायला मिळाला. एका चाहत्याने पुढी घोषणेबद्दल विचारले असता मिश्किल शाहरुख म्हणाला, ''घोषणा विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर होतात मित्रा.''

मुलींना कसे प्रभावित करावे यासंबंधातील सल्ल्यांपासून चाहत्यांनी एसआरकेवर विविध प्रश्नांचा भडिमार केला. पण त्याच्या आगामी चित्रपटाविषयीच्या प्रश्नांची नोंद शीर्षस्थानी राहिली. कारण बहुतेक चाहत्यांनी त्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायची इच्छा आहे.

शाहरुखने तासभर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि निरोप घेतला. त्याने दिलेल्या मिश्किल उत्तरामुळे ते खूश झाले होते. सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला.

शाहरुख त्याचा 'पठाण' या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. २०१८ पासून तो रुपेरी पडद्यावर झळकलेला नाही. 'झिरो' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

हेही वाचा - 'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.