ETV Bharat / sitara

Gangubai Kathiawadi Trailer : 'गंगूबाई काठीयावाडी'चा डोळे दिपवणारा धमाकेदार ट्रेलर रिलीज - गंगूबाई काठीयावाडीचा ट्रेलर रिलीज

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठीयावाडी'च्या ( Gangubai Kathiawadi Trailer ) ट्रेलरमध्ये संजय लीला भन्साळीच्या ( Sanjay Leela Bhansali ) दिग्दर्शनात आलिया ( Alia Bhatt ) ही ज्वलंत आणि नखरेबाज, वेश्यागृहाची मालकीण असून ती मुंबईच्या रेडलाईट भाग ( Mumbai Redlight Area) असलेल्या कामाठीपूरावर ( Kamathipura ) राज्य करण्यास तयार आहे.

गंगूबाई काठीयावाडी
गंगूबाई काठीयावाडी
author img

By

Published : Feb 4, 2022, 12:11 PM IST

Updated : Feb 4, 2022, 1:29 PM IST

मुंबई - गंगूबाई काठियावाडी ( Gangubai Kathiawadi ) या सिनेमातून संजय लीला भन्साळी ( ( Sanjay Leela Bhansali ) आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt ) धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रिलीजची तारीख जाहीर केल्यानंतर निर्मात्यांनी आता सिनेमाचा ट्रेलर ( Gangubai Kathiawadi Trailer ) प्रदर्शित केला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सिनेमा हॉलकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे आश्वासन मिळालेले दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' हा बहुप्रतीक्षित चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संजय लीला भन्साळींनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार आहे. अजय देवगण यांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. तर, विजय राज, सीमा पाहवा आणि इंदिरा तिवारी यांच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

'माफिया क्वीन ऑफ मुंबई'

संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट हुसैन झैदी ( Hussain Zaidi ) यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' ( Mafia Queen of Mumbai ) पुस्तकातील गंगूबाई काठियावाडी यांच्यावर लिहिलेल्या एका भागावर आधारित आहे. हुसैन झैदी यांच्या पुस्तकातील एका भागावर हा चित्रपट आधारित आहे. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मजूर मुलींसाठी काम केले आहे. यापूर्वी हा चित्रपट 11 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. चौकटीबाहेरील, धाडसी भूमिका स्वीकारल्यामुळे आलियाचे चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

हेही वाचा - अक्षयच्या 'पृथ्वीराज' चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी

Last Updated : Feb 4, 2022, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.