ETV Bharat / sitara

लग्नाचे नवीन फोटो शेअर करीत कॅटरिनाने लिहिली बहिणींसाठी इमोशनल पोस्ट - विकी कॅटरिना विवाहाचे नवीन फोटो

कॅटरिना कैफ कौशलने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लाल रंगाच्या वेडिंग ड्रेसमध्ये कॅटरिना कैफचा संपूर्ण वेडिंग लूक आता समोर आला आहे. कॅटरिनाचे हे फोटो पाहिल्यानंतर आता कळत आहे की लग्नाच्या दिवशी ती खूप सुंदर दिसत होती.

कॅटरिनाचे वेडिंग फोटो
कॅटरिनाचे वेडिंग फोटो
author img

By

Published : Dec 13, 2021, 4:29 PM IST

मुंबई - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला सोमवारी (13 डिसेंबर) चार दिवस झाले आहेत. हे कपल सतत लग्नाशी संबंधित फोटो शेअर करत असते. हळदी आणि मेहंदी समारंभानंतर, कॅटरिना कैफने आता तिच्या लग्नाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅटरिनाने एक इमोशनल नोटही लिहिली आहे.

कॅटरिनाचे वेडिंग फोटो
कॅटरिनाचे वेडिंग फोटो

या फोटोंमध्ये लाल रंगाच्या वेडिंग ड्रेसमध्ये कॅटरिना कैफचा संपूर्ण वेडिंग लूक आता समोर आला आहे. कॅटरिनाचे हे फोटो पाहिल्यानंतर आता कळते की ती लग्नाच्या दिवशी खरोखरच खूप सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये कॅटरिनाच्या बहिणीही दिसत आहेत, ज्यांनी फुलांची चादर धरलेली दिसत आहे.

कॅटरिनाचे वेडिंग फोटो
कॅटरिनाचे वेडिंग फोटो

हे फोटो शेअर करताना कॅटरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय भावनिक नोटही लिहिली आहे. ती लिहिते, 'जसे आम्ही मोठे झालो, तसे आम्ही बहिणींनी नेहमीच एकमेकांची काळजी घेतली. त्या माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहेत. आम्ही नेहमी एकमेकांना जमिनीशी जोडून ठेवतो. हे नेहमी असेच राहिले पाहिजे'.

कॅटरिनाचे वेडिंग फोटो
कॅटरिनाचे वेडिंग फोटो

कॅटरिना कैफच्या लग्नाच्या या नवीन फोटोंना 8 लाख 56 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे, ज्यावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कमेंट करत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरने या पोस्टवर 'स्टनिंग' कमेंट केली आहे.

कॅटरिनाचे वेडिंग फोटो
कॅटरिनाचे वेडिंग फोटो

त्याचबरोबर सोशल मीडियावर उपस्थित अभिनेत्रीचे चाहतेही पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी बनवून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'सर्वात सुंदर वधू'.

दुसऱ्याने लिहिले, 'विकी भाई लकी है'. तर एकाने लिहिलंय, 'असेच नेहमी हसत आणि आनंदी राहा. शुभेच्छा.'

हेही वाचा - Ankita Lokhande Mehandi : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेंहदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.