ETV Bharat / sitara

...म्हणून एकता कपूरने मानले 'ड्रीम गर्ल'चे आभार, पाहा व्हिडिओ - एकता कपूर

'ड्रीम गर्ल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.०५ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने आयुष्मानच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

...म्हणून एकता कपूरने मानले 'ड्रीम गर्ल'चे आभार, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:35 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांची जोडी असलेला 'ड्रीम गर्ल' चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता असल्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एवढंच काय तर हा चित्रपट आयुष्मानच्या चित्रपट करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी डबल डिजीट आकड्यांची दमदार ओपनिंग करणाऱ्या 'ड्रीम गर्ल' म्हणजेच आयुष्मान खुरानाचे एकता कपूरने आभार मानले आहेत.

'ड्रीम गर्ल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.०५ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने आयुष्मानच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

हेही वाचा -आयुष्य तुझ्यासोबत आणखीच सुंदर वाटतं, ताहिराची आयुष्मानसाठी पोस्ट

या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
२०१७ - 'बरेली की बर्फी' २.४२ कोटी
२०१८ - अंधाधून - २.७० कोटी
२०१७ - शुभ मंगल सावधान - २.७१ कोटी
२०१९ - आर्टिकल १५ - ५.०७ कोटी
२०१८ - बधाई हो - ७.३५ कोटी

हेही वाचा -पहिल्याच दिवशी 'ड्रीम गर्ल'नं रचला नवा विक्रम, जाणून घ्या कमाई

एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, राज शांडल्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात आयुष्मानने साकारलेल्या 'पूजा' नावाच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट आणखी किती गल्ला जमवतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -Public Review: आयुष्मानच्या 'ड्रीमगर्ल'ची चाहत्यांवर भूरळ, अशा दिल्या प्रतिक्रिया

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.