ETV Bharat / sitara

स्वप्नील जोशीचे भाकीत, “‘लेट्सफ्लिक्स मराठी' मुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे”! स्वप्नील जोशीने 'लेटफ्लिक्स' सोबतच्या नव्या उपक्रमाची केली घोषणा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेता स्वप्नील जोशीने 'लेटफ्लिक्स' सोबतच्या नव्या उपक्रमाची केली घोषणा केली आहे. तो काय नवीन घेऊन येतोय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

author img

By

Published : Apr 15, 2021, 3:04 PM IST

swwapnil_joshi
स्वप्नील जोशीचे भाकीत

अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच नवनवीन गोष्टी करीत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत असतो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याने 'लेटफ्लिक्स' सोबतच्या नव्या उपक्रमाची केली घोषणा केली असून तो काय नवीन घेऊन येतोय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया व इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहूल नार्वेकर या दोघांनी मिळून 'लेटफ्लिक्स' हे नवे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले. आपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. तो म्हणतो की, “‘लेट्सफ्लिक्स मराठी' मुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगलासह इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम, वेब सीरिज, शॉर्टफ्लिम्स, डॉक्युमेंट्रीज व ओरिजनल मराठी सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.”

स्वप्नील जोशीचे भाकीत

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या व्हिडिओमध्ये त्याने 'लेटफ्लिक्स' सोबतच्या त्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. हा उपक्रम काय असेल, कशाशी निगडित असेल हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले. त्याच्या ह्या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.

स्वप्नील जोशीचा हा नवा उपक्रम सिनेमा असेल का किंवा एकदा कार्यक्रम किंवा वेब सीरिज? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १ मेला मिळणार आहेत.

हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.