ETV Bharat / sitara

'त्या' मंजुळ आवाजाची प्रेक्षकांवर भूरळ,'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर शतक - 100 cr collection of bollywood films

आयुष्मानच्या ड्रीम गर्ल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शतक पार केले आहे. सोमवारपर्यंत या सिनेमाने १०१.४० कोटींची कमाई केली आहे. आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर शतक
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:01 PM IST

मुंबई - 'आर्टिकल १५' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता आयुष्मान खुराणा ड्रीम गर्ल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातून आयुष्मानने एक आगळी वेगळी भूमिका साकारली. ज्यात तो पुजा नावाने अनेकांशी मुलीच्या आवाजात बोलून आपल्या प्रेमात पाडताना दिसला. आपल्या याच मंजुळ आवाजाने त्यानं प्रेक्षकांवरही भूरळ पाडली आहे.

आयुष्मानच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शतक पार केले आहे. सोमवारपर्यंत या सिनेमाने १०१.४० कोटींची कमाई केली आहे. आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमातील एक व्हिडिओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच प्रेक्षकांचे आभारदेखील मानले आहेत.

या चित्रपटात आयुष्मानशिवाय नुशरत भरुचा या अभिनेत्रीची देखील महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याशिवाय आयुष्मान लवकरच बाला सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

राज्य सहकारी बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो

राज्य सहकारी बँकेत मी कधीही संचालक नसल्याचे शरद पवार म्हणाले. तपास करणाऱ्या यंत्रणेला आधिकार आहेत. मी त्यांना सहकार्य करणार आहे. मी संविधानावर विश्वास ठेवणारा असल्याचे पवार म्हणाले. 

राज्य सहकारी बँक ही महत्त्वाची आहे. ज्या कालखंडामध्ये चौकशी करण्याची भूमिका घेण्यात आली, त्यात एका पक्षाचे लोक नव्हते. राज्यात पक्षीय विचार दूर ठेवून काम करण्याची परंपरा होती. आता मात्र सत्तेतील लोक तसे राहिले नसल्याचे पवार म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.