ETV Bharat / sitara

'ड्रीम गर्ल' अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभचा कोरोनाने मृत्यू, 'चिडीयाघर', ‘हॅलो चार्ली’तही केले होते काम

अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रिंकू सिंह निकुंभच्या मृत्यूची माहिती तिची चुलत बहीण चंदा सिंह यांनी दिली.

'Dream Girl'
रिंकू सिंह निकुंभ
author img

By

Published : Jun 4, 2021, 4:21 PM IST

Updated : Jun 4, 2021, 5:35 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल' चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रिंकू सिंह निकुंभच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर चित्रपट जगतात शोक लहर पसरली आहे. सेलिब्रिटींबरोबरच तिच्या मृत्यूमुळे चाहतेही दुःखी झाले आहेत. रिंकू सिंह निकुंभच्या मृत्यूची माहिती तिची चुलत बहीण चंदा सिंह यांनी दिली.

'Dream Girl'
रिंकू सिंह निकुंभ आणि आयुष्मान खुराना

रिंकू सिंह निकुंभ उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जात होती. टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'चिडीयाघर'मुळे तिने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते. रिंकू सिंह निकुंभ अखेर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘हॅलो चार्ली’ चित्रपटामध्ये दिसली होती. तिने 'चिडीयाघर'सह 'बालवीर' यासारख्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले होते.

'Dream Girl'
'ड्रीम गर्ल' अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ

हेही वाचा - HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!!

रिंकू सिंह निकुंभची चुलत बहीण चंदा सिंह यांनी सांगितले, "२५ मे रोजी ती कोविड संक्रमित झाली होती. ती घरी एकाकी पडली होती. तिचा ताप कमी होत नव्हता म्हणून आम्ही काही दिवसांनी रुग्णालयात जायचा निर्णय घेतला. डॉक्टरांना वाटले नाही की तिला आयसीयूबेडची आवश्यकता आहे आणि तिला सामान्य कोविड वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिला दम्याचाही त्रास होता. ती खूप आनंदी आणि उत्साही होती. "

हेही वाचा - मुंबईत दीड लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई, ९ कोटी ५० लाखांचा दंड वसूल

Last Updated : Jun 4, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.