ETV Bharat / sitara

माधुरी दीक्षित डॉ. नेने यांना तिच्या तालावर नाचायला लावते! - madhuri dikshit latest news

जेव्हा माधुरीला विचारले गेले की लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या पतीदेवांना, डॉ. नेनेंना, डान्सचा एखादा प्रकार शिकवला का, तेव्हा माधुरी म्हणाली, "मी त्यांना डान्स करायला शिकवले नसले तरी ते माझ्या तालावर नक्कीच नाचतात!"

माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित
author img

By

Published : Feb 21, 2021, 1:52 PM IST

मुंबई - बघायला गेलं तर प्रत्येक बायको नवऱ्याला आपल्या तालावर नाचवते असं समस्त नवरे मंडळींचं मत असल्याचं विनोदात म्हटलं जातं. बॉलीवूडची धक धक गर्ल, सदाबहार डान्सिंग दिवा, माधुरी दीक्षित सुद्धा याला अपवाद नसावी. कलर्सचा डान्स रियालिटी शो डान्स दीवानेच्या ग्रँड शुभारंभ प्रसंगी तुषार कालिया, धर्मेश येलांडे या सहकारी परीक्षकांसोबत आणि होस्ट राघव जुयाल सोबत या अभिनेत्रीने प्रश्नांना सामोरे जाताना तिच्या मनोरंजक आणि चलाख उत्तरांनी सर्वांना चकित केले. जेव्हा तिला विचारले गेले की लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या पतीदेवांना, डॉ. नेनेंना, डान्सचा एखादा प्रकार शिकवला का, तेव्हा माधुरी म्हणाली, "मी त्यांना डान्स करायला शिकवले नसले तरी ते माझ्या तालावर नक्कीच नाचतात!"

डॉ. नेने यांना तिच्या तालावर नाचायला लावते!
माधुरी दीक्षित
माधुरीने तिच्या उत्कृष्ट सह-परीक्षक व होस्ट सोबत शोचा शुभारंभ केला. या चौघांनी स्पर्धकांसोबत काही श्वास रोखून धरणारे परफॉर्मन्स सादर केले आणि कार्यक्रमात रंगत आणली. डान्स दीवाने आता नव्या सीझनसह परत आला आहे. वक्त को नचायेंगे, डान्स मचायेंगे, अशी टॅगलाईन घेऊन हा शो आला आहे. यात तीन पिढ्यातील स्पर्धक जोडीने किंवा तिकडीने डान्स करतील आणि चँपियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा करतील.हेही वाचा - पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू; शाळा-महाविद्यालये राहणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.