ETV Bharat / sitara

..'ते' पत्र वाचलं आणि रोहित पवारांच्या डोळ्यात आलं पाणी

author img

By

Published : Dec 12, 2020, 7:49 PM IST

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यात सहभागी झाले होते. यावेळी पोस्टमन सागर कारंडेने वाचलेले पत्र ऐकताना रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Rohit Pawar
रोहित पवार

मुंबई - कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे 'झी मराठी' वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. येत्या १४ ते १६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या भागात राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहेत.

यंदा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी आपल्याला दिसणार आहेत. ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार’. महाराष्टारातील हे युवा चेहरे ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर दिसणार आहेत.

रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी

याच कार्यक्रमात ‘पोस्टमन काका सागर कारंडे’ यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचा दुःख सांगणारं पत्र सादर केलं, आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं.

हेही वाचा -वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत

हे पत्र ऐकून डोळे पाणावलेल्या रोहित पवार यांच्यासह तिन्ही नेत्यांनी नक्की काय उत्तर दिलं ते या आठवड्यात आपल्याला पहायला मिळणार आहे.

हेही वाचा -नो किसिंग पॉलिसी रद्द केल्यास विजय देवराकोंडाचे चुंबन घेईन - तमन्ना भाटिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.