मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. दिशाच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आपल्या ग्लॅमरस शैलीने चाहत्यांना वेड लावत असते. सध्या सर्वांच्या ओठावर दिशाचेच नाव आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहत्यांसह या फोटोवर सेलेब्सही कमेंट करताना दिसत आहेत. दिशाचा हा सूर्यास्त लूक चाहत्यांना वेड लावत आहे. फोटोमध्ये दिशा स्विमवेअरमध्ये नेहमीप्रमाणेच परफेक्ट दिसत आहे.
दिशा पटानीने अलीकडेच बीचचा एक फोटो शेअर केला आहे. दिशा तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी गेली आहे. दिशा लाल रंगाच्या टू पीसमध्ये दिसत आहे. तसंच तिची ही स्टायलिश पोज तिचं फोटोला परिपूर्ण बनवत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, तू तुझ्यावरुन नजर हटवू देत नाहीस.
नुकताच टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवर एक मोशन व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओचे कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर टायगरने नुकतेच त्याच्या आगामी 'गणपथ' चित्रपटाचे लंडनमधील शेड्यूल पूर्ण केले आहे. हा चित्रपट विकास बहल दिग्दर्शित डिस्टोपियन थ्रिलर आहे, यामध्ये क्रिती सेनन देखील आहे.
दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशाने स्पोर्ट्स फिल्म बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' द्वारे तिची ओळख निर्माण केली आहे. दिशाने 'लोफर' चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. आता ती 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'केटीना'मध्ये दिसणार आहे. नुकताच दिशा पटनीचा 'राधे' हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत होती.
हेही वाचा - Year Ender 2021 : सुहाना खान या फोटोमुळे राहिली वर्षभर सतत चर्चेत