मुंबई - हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा टायगर श्रॉफ आणि एम. एस. धोनी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दिशा पटानी यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. हे कपल अनेकदा एकत्र स्पॉट झालं आहे. त्यामुळे, दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं वृत्त माध्यांमधून समोर येत असतं.
अशात आता दिशाने या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिशाला एक प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही दोघं सर्वांसमोर तुमचं नातं मान्य का करत नाही? जेव्हा सर्वांनाच तुमची जोडी पसंत आहे. यावर उत्तर देताना दिशा म्हणाली, मी गेल्या अनेक वर्षांपासून टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. आता भारत चित्रपटाच्या निमित्ताने त्याला इम्प्रेस करण्याचे माझे प्रयत्न कदाचित यशस्वी होतील. कारण, या चित्रपटात मी काही स्टंट केले आहेत.
आम्ही अनेकदा एकत्र जेवायला जातो याचा अर्थ असा नाही, की तो इम्प्रेस झाला आहे. पुढील वेळी तुम्हीच त्याच्यासोबत या विषयावर बोला. कारण आम्ही दोघेही लाजाळू असल्यामुळे दोघांकडूनही पुढाकार घेतला जात नसल्याचे तिने म्हटलं आहे. एकंदरीतच दरवेळीप्रमाणे यावेळीदेखील दिशाने आपल्या नात्याविषयी अधिकृत घोषणा करण्यास टाळाटाळ केली आहे.