ETV Bharat / sitara

दिलीप कुमारः बॉलिवूडचा पहिला 'कोहिनूर' सुपरस्टार काळाच्या पडद्याआड

दिलीप साब यांचा जन्म ११ डिसेंबर रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे युसुफ खान या नावाने फळ व्यापारी लाला गुलाम सरवर यांच्या घरी झाला. पुढे ही सरवार कुटुंब महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देवळाली येथे आले. युसुफ यांचे शिक्षणही देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये झाले. दिलीप कुमार यांना १९४४ मध्ये अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'ज्वार भाटा' हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे त्यांनी तत्कालिन फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले.

कोहिनूर' सुपरस्टार
कोहिनूर' सुपरस्टार
author img

By

Published : Jul 7, 2021, 11:08 AM IST

Updated : Jul 7, 2021, 11:47 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वार्धक्याशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात निधन झाले. अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप साब यांची एक खास लकब आणि अभिनय शैली होती. भारतात स्टारडम रुजवणाऱ्यांपैकी ते प्रथम होते. खऱ्या अर्थाने भारताचा पहिला सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

दिलीप साब यांचा जन्म ११ डिसेंबर रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे युसुफ खान या नावाने फळ व्यापारी लाला गुलाम सरवर यांच्या घरी झाला. पुढे ही सरवार कुटुंब महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देवळाली येथे आले. युसुफ यांचे शिक्षणही देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये झाले.

ट्रॅजेडी किंग
ट्रॅजेडी किंग

१९३० च्या उत्तरार्धात, सरवार कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले, परंतु नवीन ठिकाणी युसूफचे लक्ष जास्त काळ टिकले नाही. युसुफ यांनी आपला मुक्काम पुणे येथे हलवला. त्याकाळातील भारतीय सिनेमाची लोकप्रिय नायिका देवकी राणी यांच्याशी झालेल्या बेटीनंतर युसुफ यांचे आयुष्यच बदलले. तिथूनच युसुफ यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली आणि युसुफ खान यांनी दिलीप कुमार हे नाव धारण केले. आणि अशा प्रकारे अखेर भारताला पहिला महान सुपरस्टार मिळाला.

सहा दशकात ५७ चित्रपटात केले काम

दिलीप कुमार यांना १९४४ मध्ये अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'ज्वार भाटा' हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे त्यांनी तत्कालिन फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले. पुढील ६-७ वर्षात त्यांच्या नावावर 'जुगनू', 'शहीद', 'मेला', 'आन', 'दाग', 'आरझू' आणि 'दीदार' यासारखे चित्रपट होते. याकाळात दिलीप कुमार यांची कारकिर्द बहरत चालली होती आणि एक स्टार घडत होता. ही तर फक्त एक सुरुवात होती. त्यानंतरच्या वर्षांत दिलीप साबने आम्हाला देवदास (१९५५), आझाद (१९५५), नया दौर (१९५७), मधुमती (१९५८), पैगाम (१९५९), कोहिनूर (१९६० ), मुघल-ए-आजम (१९६०) आणि गंगा जमुना (१९६१) असे एकाहून एक सरस चित्रपट दिले. या सहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ५७ चित्रपटात काम केले. त्यापैकी दोन बंगाली होते. मेहबूब खानचा 'मदर इंडिया', गुरू दत्तचा 'प्यासा', आणि राज कपूरचा 'संगम' हे तिन्ही चित्रपट पहिले दिलीप कुमारला ऑफर केले होते. मात्र, काही कारणाने त्यांनी हे चित्रपट नाकारले. त्यांनी डेव्हिडचा 'लॉरेन्स ऑफ आर्बिया' या चित्रपटही नाकारला.

मुघल - ए- आझम
मुघल - ए- आझम

'किला' हा अखेरचा चित्रपट

दिलीप कुमार हे १९७६ ते १९८१ या काळात रुपेरी पडद्यापासून दूर होते. १९८१ मध्ये ते क्रांती या सिनेमातून पुन्हा परतले. त्यानंतर 'विधाता', 'शक्ती', 'मशाल' आणि १९८६ मध्ये 'कर्मा' हा चित्रपट त्यांनी केला. अर्थातच या सर्वच चित्रपटांना लोकप्रियता लाभली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपले वय झाल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे सुपरस्टार या पदाची झूल त्यांनी उतरायची ठरवले होते. १९९१ मध्ये त्यांनी 'सौदागर' हा चित्रपट बनवला. हा त्यांचा संस्मरणीय ठरलेला अखेरचा सिनेमा होता. पण किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता.

पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करताना
पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करताना

पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

त्याच्या ५७ चित्रपटांपैकी आठ चित्रपटांना त्यांना फिल्मफेयरचा पुरस्कार मिळाला. १९९१ त्यांना 'पद्मविभूषण' तसेच १९९३ राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, १९९५ला 'दादासाहेब फाळके', हा पुरस्कार तसेच १९९७ ला पाकिस्तानमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'निशान - ए - ईम्तीयाझ' हा पुरस्कार मिळाला.

नर्गिस आणि दिलीप
नर्गिस आणि दिलीप

फिमेल फॉलोईंग

दिलीप कुमार यांचे महिला फॅन फॉलोइंग प्रचंड होते. मात्र पुढे जाऊन त्यांनी अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी विवाह केल्यामुळे असंख्य तरुणी निराश झाल्या. पण त्याला दिलीप साब यांचा नाईलाज होता. याच सायरा बानो यांनी आपला संसार सुखी करण्यासाठी, दिलीप कुमार यांच्या प्रेमापोटी आपली अभिनय कारकिर्द सोडली. त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या त्यांची सेवा करीत राहिल्या.

दिलीप कुमार यांची कारकिर्द ६० च्या दशकातही वाढतच होती. या दरम्यान दिलीप साब यांनी 'लीडर', 'दिल दिया दर्द लिया', 'राम और श्याम', 'आदमी' आणि 'गोपी' यासारखे चित्रपट तिकीट बारीवर धुमाकुळ घालत होते. याच दरम्यान दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतून ५ वर्षांची विश्रांती घेतली. या काळात राजेश खन्ना यांची लोकप्रियता वाढीस लागली होती. दिलीप कुमार यांच्यानंतर दुसरे सुपरस्टार अशी त्यांची ख्याती बनत चालली होती आणि तिसरे सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चन यांच्याही कारकिर्दीला दमदार सुरुवात झाली होती.

राम और श्याम
राम और श्याम

कामिनी कौशलवर होते पहिले प्रेम

वैयक्तीक आणि व्यावसायिक जीवनातही दिलीप कुमार यांचे ओळख प्रेमकथांना नायक अशीच होती. ''मी मरेपर्यंत मधुबालावर प्रेम करेन.'' असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते दोघे सहा वर्षे एकत्र होते. त्यांचे नाते मधुबालाच्या वडिलांना मान्य नसल्याने त्यांचे नाते तुटले. पाकिस्तानच्या कामिनी कौशलवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांनी हैदराबादी सुंदरी असलेल्या अस्मा रेहमानशी लग्न केले होते. त्यांचे लग्न फक्त दोनच वर्ष टिकले.

अभिनय कारकिर्दीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अनमोल असे राहिले आहे. अभिनयाचे ते विद्यापीठ होते. जोवर हिंदी चित्रपटसृष्टी आहे तोवर दिलीपजी आणि त्यांची अभिनय कारकीर्द अमर आहे.

हेही वाचा - वयाच्या १२ वर्षांपासूनच दिलीप कुमारवर फिदा होत्या सायरा बानो; अशी आहे लव्ह स्टोरी

Last Updated : Jul 7, 2021, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.