मुंबई - दम लागल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहेत आणि त्यांना तीन ते चार दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांच्यावर उपचार करणार्या छातीतज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी मंगळवारी सांगितले.
दिलीप कुमार (वय ९८) हे रविवारपासून हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
"दिलीप कुमार यांची तब्येत सुधारत आहे आणि श्वास घेण्याची समस्या देखील कमी झाली आहे, पण ते ऑक्सिजनच्या आधारावर कायम आहेत. ते स्थिर आहेत. कदाचित त्याला तीन ते चार दिवसांत डिस्चार्ज मिळू शकेल." असे डॉक्टर पारकर म्हणाल्या.
-
Message from Saira Banu pic.twitter.com/TDQzXDAigs
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Message from Saira Banu pic.twitter.com/TDQzXDAigs
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021Message from Saira Banu pic.twitter.com/TDQzXDAigs
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021
सोमवारी, पारकर म्हणाल्या होत्या की, दिलीप कुमार यांची तब्येत सुधारली आहे, ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण चांगले आहे आणि श्वास घेण्यासाठीचा त्यांचा त्रासही कमी झाला आहे.
काल संध्याकाळी दिलीप कुमार यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी प्रार्थना व शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. "माझे पती, माझा कोहिनूर, आपल्या दिलीपकुमार साहब यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांनी मला लवकरच डिस्चार्ज देण्याचे आश्वासन दिले आहे," असे ७६ वर्षीय सायरा बानो यांनी लिहिले आहे.
-
Latest. An hour ago. pic.twitter.com/YBt7nLLpwL
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Latest. An hour ago. pic.twitter.com/YBt7nLLpwL
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021Latest. An hour ago. pic.twitter.com/YBt7nLLpwL
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021
सायरा बानो यांनीदिलीप कुमार यांचा एक फोटोही शेअर केला होता. दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यात नियमित आरोग्य तपासणीसाठी याच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही पाहा - बिग बी शुटिंगसाठी पुन्हा सज्ज, 'या' चित्रपटाचे सुरू करणार शुटिंग