मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मुख्य भूमिका असलेला 'दिल बेचारा' हा चित्रपट २४ जुलै रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. मात्र लोकांच्या भावना लक्षात घेता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज व्हावा, अशी इच्छा दिलजीत दोसन्जने बोलून दाखवली आहे. 'दिल बेचारा' हा चित्रपट सुशांतच्या करियरमधील शेवटचा चित्रपट आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुशांतसिंह राजपूतने १४ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. दिवंगत अभिनेता सुशांतचा हा चित्रपट सर्वांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न डिस्ने हॉटस्टारने करायचा ठरवले आहे. डिस्नेचे अध्यक्ष उदय शंकर यांनी ही घोषणा सोमवारी एका पत्रकार परिषदेत केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केले आहे.
'दिल बेचारा' हा चित्रपट हॉलिवूडच्या गाजलेल्या 'द फ़ॉल्ट इन अवर स्टार्स' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता दिलजीत दोसन्ज याने सोमवारी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्याने हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला पाहिजे असे म्हटलंय.
सुशांतसिंह राजपूतचे १४ जून रोजी निधन झाले होते. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.