मुंबई - आशिकी गर्ल श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य स्टार प्रभास यांचा साहो सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हे दोन्ही कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असतानाच, अशा बातम्या समोर येत आहेत, की साहो सिनेमासाठी श्रद्धाने ८ कोटी रुपये घेतले.
मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार ही बातमी खोटी असून ही केवळ पीआरसाठी सांगितलेली रक्कम आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत टॉलिवूडमधील कलाकारांना अगदी कमी पैशात काम करावे लागते. त्यामुळे, श्रद्धाला या सिनेमासाठी केवळ ३ कोटी मानधन मिळाले असल्याचे म्हटले जात आहे.
श्रद्धापूर्वी निर्मात्यांनी या सिनेमासाठी कॅटरिना कैफकडे विचारणा केली होती. मात्र, तिनं ५ कोटींची मागणी केल्याने हा चित्रपट श्रद्धाच्या हाती आला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सुजित यांचं दिग्दर्शन असलेला बिग बजेट साहो सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.