ETV Bharat / sitara

Dia Mirza Baby Boy: दिया मिर्झा बनली आई;  गोंडस मुलाला दिला जन्म - दिया मिर्झा झाली आई

दियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या मुलाची झलक दाखवताना म्हटले आहे की, 14 मे रोजी मी आई झाले आहे. त्याचसोबत तिने विदेशी लेखिका एलिझाबेथ स्टोनच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. आपल्याला एक मुलगा झाला की आपल्याला याची जाणिव होते की आपले हृदय आपला शरीराजवळ नेहमी राहावे.

Dia Mirza welcomes baby boy with husband Vaibhav Rekhi
लग्नानंतर चार महिन्यातच दिया मिर्जा झाली आई
author img

By

Published : Jul 14, 2021, 1:32 PM IST

Updated : Jul 14, 2021, 1:56 PM IST

हैदराबाद : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दियाने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून तिने स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. दियाने दिलेल्या या गुड न्यूजवर सोशल मीडियातून तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना ही गूड न्यूज सांगितली आहे. 14 मे रोजी आई झाल्याची गोड बातमी तिने चाहत्यांना एक पोस्ट करून सांगितली आहे. दियाने आपल्या मुलाचे नाव अव्यान आझाद असे ठेवले आहे. तिने 15 फेब्रुवारी रोजी उद्योगपती वैभव रेखी यांच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर दीड महिन्यांतच दियाने चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची बातमी दिली होती.

दियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या मुलाची झलक दाखवताना म्हटले आहे की, 14 मे रोजी मी आई झाले आहे. त्याचसोबत तिने परदेशी लेखिका एलिझाबेथ स्टोन हिच्या काही ओळीही यासोबत शेअर केल्या आहेत. "आपल्याला एक मुलगा झाला की आपल्याला याची जाणिव होते की आपले हृदय आपला शरीराजवळ नेहमी राहावे." या ओळी दियाने यासोबत शेअर केल्या आहेत.

पुढे ती असे म्हणते की, माझे हे शब्द त्यावेळच्या माझ्या आणि वैभव रेखी च्या भावनाचे उदाहरण आहेत. आमच्या हृदयाच्या तुकड्याचा म्हणजेच अव्यान आझाद रेखी (Avyaan Azaad Rekhi) जन्म 14 रोजी झाला. त्याचा जन्म लवकर झाल्यामुळे त्याला नवजात बालकांच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी परिचारिका आणि डॉक्टरांनी खूप काळजी घेतली. असे तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.