ETV Bharat / sitara

दिया मिर्झाने सांगितला बाळंतपणात मृत्यूच्या जवळ गेल्याचा अनुभव

दिया मिर्झासाठी २०२१ हे वर्ष अत्यंत खडतर आणि रोमांचक होते. याच वर्षी तिचा विवाह वैभव रेखीसोबत झाला. याच वर्षी दोघांनी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. पंतु तिचे बाळंतपण एक मोठी परीक्षा होती. तिला संसर्ग झाला होता आणि याच काळात तिची प्री मॅच्यूअर डिलीव्हरी झाली. आपल्याला आणि मुलाला वाचवल्याबद्दल तिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

दिया मिर्झा
दिया मिर्झा
author img

By

Published : Jan 11, 2022, 12:20 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झासाठी 2021 हे महत्त्वाचे वर्ष होते. उद्योगपती वैभव रेखीशी लग्न करण्यापासून ते त्यांच्या पहिल्या मुलाचे एकत्र स्वागत करण्यापर्यंत आणि मृत्यूच्या जवळ जाण्याचा आलेला अनुभव, असे तिच्यासाठी खडतर आणि रोमांचक असे हे वर्ष होते. दियाने 2021 ला तिची आई बनवण्याचे वर्ष म्हणून कृतज्ञतेने आभार मानले. दियाने सर्व महिन्यांतील क्षणांचा व्हिडिओ कोलाज पोस्ट केला आहे.

क्लिपच्या सोबत, तिने लिहिलंय: "मला आई बनवल्याबद्दल #2021 चे आभार. हे वर्ष अविश्वसनीय आनंदाने भरलेले होते, मृत्यूच्या जवळ आलेला अनुभव, आमच्या मुलाचा जन्म आणि काही अत्यंत कसोटीचे अनुभव होते. पण चांगले धडे शिकलेले आहेत. सर्वात मोठे शिक्षण - सर्वात कठीण काळ टिकत नाही. श्वास घ्या. साक्षीदार व्हा. आत्मसमर्पण करा. आणि कृतज्ञ रहा. प्रत्येक दिवशी."

मृत्यूच्या जवळ जाण्याचा अनुभव सांगताना एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत दिया म्हणाली: "माझ्या गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात मला अॅपेन्डेक्टॉमीसाठी जावे लागले. त्यानंतर तीव्र जिवाणूमुळे मी रुग्णालयात सतत येत जात होते. मी माझ्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात असताना मला सेप्सिसचा संसर्ग झाला होता."

दिया पुढे म्हणाली की तिच्या बाळाची प्रसूती होणे कठीण होते कारण तिच्या नाळेतून रक्तस्त्राव सुरू झाला होता. तिचे आणि बाळाचे प्राण वाचवल्याबद्दल दियाने तिच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दियाच्या चिमुरडीचा जन्म 15 मे रोजी आयसीयूमध्ये इमर्जन्सी सी-सेक्शनद्वारे जन्म झाला आणि नवजात शिशुला परिचारिका आणि डॉक्टरांनी सांभाळले. दीया आणि वैभव यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये एका इंटिमेट लग्नसोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. तिने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

साहिल संघासोबत झाले होते पहिले लग्न

दियाने तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत २०१४ मध्ये लग्न केले आणि २०१९ मध्ये दोघे वेगळे झाले. वैभव रेखीचे पहिले लग्न योग आणि जीवनशैली प्रशिक्षक सुनैना यांच्याशी झाले होते आणि दोघांना समायरा नावाची मुलगी देखील आहे. दियाने 2000 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा ताज जिंकला होता. 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली होती. मात्र, तिचे बॉलिवूड करिअर काही खास नव्हते.

हेही वाचा - अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर, हिंदी भाषेतील 'पुष्पा' झळकणार ओटीटीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.