ETV Bharat / sitara

दिया मिर्झाने सावत्र मुलगी समायरासोबत केला डान्स, पाहा - वैभव रेखीच्या माजी पत्नीची प्रतिक्रिया

दिया मिर्झा आणि तिची सावत्र मुलगी समायरा यांच्यात एक सुंदर नाते आहे. सोशल मीडिया पोस्ट्सवरून त्यांच्यातील हे नाते स्पष्ट दिसून येते. तिच्या ताज्या पोस्टमध्ये अभिनेत्री दिया समायरासोबत एकॉनच्या बॅनान्झा ट्रॅकवर नाचताना दिसत आहे.

author img

By

Published : Jan 10, 2022, 4:02 PM IST

दिया मिर्झा आणि तिची सावत्र मुलगी
दिया मिर्झा आणि तिची सावत्र मुलगी

मुंबई (महाराष्ट्र) - पर्यावरणवादी अभिनेत्री दिया मिर्झाने तिची सावत्र मुलगी समायरा हिच्यासोबत आंतरराष्ट्रीय गायक एकॉनच्या गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

समायरा ही दियाचा पती वैभव रेखी आणि त्याची माजी पत्नी सुनैना यांची मुलगी आहे. दीया आणि वैभव रेखी यांचा गेल्या वर्षी लग्नसोहळा पार पडला होता. त्यांनी मे २०२१ मध्ये त्यांनी पहिल्या अपत्याचे एकत्र स्वागत केले होते.

दियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये आई-मुलीच्या जोडीने एकॉनच्या बॅनन्झा ट्रॅकवर ताल धरलेला दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सुनैनाला आवडला आहे. दियासोबतच्या तिच्या मुलीच्या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सुनैनाने लिहिलंय, "आवडले!! खूप छान दिसत आहात." याला दियानेही उत्तर देऊन सुनैनाला दाद दिली आहे.

दिया मिर्झाची समायरासोबत बॉन्डिंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा तिने वैभवसोबत २०२१च्या फेब्रुवारीत लग्न केले तेव्हा समायरा तिच्यासोबत होती. इतकेच नाही तर ही जोडी जेव्हा मालदिवला हनीमुनसाठी गेली होती तेव्हा समायराही त्यांच्यासोबत होती.

कामाच्या आघाडीवर, दिया मिर्झा अनुभव सिन्हा यांच्या आगामी भिड या सामाजिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा - सुझानने हृतिक रोशनला म्हटले, ''जगातील सर्वोत्तम बाबा''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.