ETV Bharat / sitara

सारा अली आणि धनुषची जोडी झळकणार 'रांझणा'च्या सीक्वेलमध्ये? - केदारनाथ

सारा अली खान आणि धनुष यांची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटत ते एकत्र काम करतील. रांझणा या गाजलेल्या चित्रपटाचा हा सीक्वेल असेल.

सारा अली आणि धनुष
author img

By

Published : Sep 10, 2019, 12:32 PM IST

मुंबई - सारा अली खानने 'केदारनाथ' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या मनावर छाप सोडली. त्यानंतर ती प्रचंड एनर्जी असलेल्या रणवीर सिंगसोबत 'सिम्बा'मध्ये झळकली. पतोडी घराण्याची राजकन्या असलेल्या साराला आता दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

आनंद एल राय यांच्यासोबत धनुषचे घट्ट नाते तयार झालंय. त्यांच्या चित्रपटातूनच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता हे दोघे दिग्गज पुन्हा एकत्र येत असल्यामुळे चाहत्यांसाठी ही पर्वणी असू शकते.

'रांझणा' या चित्रपटाचा सीक्वेल बनणार असून सारा आणि धनुष यांच्यासह इतर कलाकारांची टीम बनत आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटींग सुरू होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.