मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणच्याविरूद्ध अश्लीलतेबाबत एफआयआर दाखल झाल्यानंतर अभिनेता गुलशन देवैय्या याने गोवा पोलिसांना एक मजेशीर सल्ला दिला आहे. गुलशनने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''मिलींद सोमण, कव्हर अप विथ केला अँड वेट फॉर कुंभमेला,'' असे म्हणत त्याने गोवा पोलिसांचा नावाचा उल्लेख केला आहे.
-
Milind Soman! cover up that kela,
— Gulshan Devaiah (@gulshandevaiah) November 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
And wait for kumbha mela ~ Goa police
">Milind Soman! cover up that kela,
— Gulshan Devaiah (@gulshandevaiah) November 7, 2020
And wait for kumbha mela ~ Goa policeMilind Soman! cover up that kela,
— Gulshan Devaiah (@gulshandevaiah) November 7, 2020
And wait for kumbha mela ~ Goa police
४ नोव्हेंबर रोजी मॉडेल अभिनेता मिलींद सोमणने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीचवर विवस्त्र होऊन धाव घेतली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे मिलींदवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - कमल हसन यांचा ६६ वा वाढदिवस, दोन्ही लेकींनी दिल्या शुभेच्छा!!
गोव्याच्या वास्को पोलीस स्टेशनमध्ये मिलींद सोमणच्या विरोधात 'गोवा सुरक्षा मंच' या संघटनेने तक्रार दाखल केली आहे. मिलींदने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे गोव्याच्या संस्कृतीचा अपमान होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अद्याप मिलींद सोमणवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु चौकशीसाठी त्याला पोलिसांसमोर जावे लागेल आणि कारवाईचाही सामना करावा लागेल.
४ नोव्हेंबर रोजी मिलींद सोमणने बीचवर विवस्त्र धावत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो त्याची पत्नी अंकिताने क्लिक केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, ''हॅप्पी बर्थ डे टू मी.''