ETV Bharat / sitara

सलमानच्या 'भारत'विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली - salman khan

सिनेमाच्या 'भारत' या शीर्षकामुळे भावना दुखावत असल्याचा दावा करत एका व्यक्तीनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय चित्रपटातील एक डायलॉग वगळण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.

'भारत'विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
author img

By

Published : Jun 3, 2019, 7:55 PM IST

मुंबई - सलमान खानची मुख्य भूमिका असलेला 'भारत' चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. आता हा बहुचर्चित चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार असतानाचा चित्रपटाच्या शीर्षकाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

चित्रपटाविरोधातील ही याचिका आता दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सिनेमाच्या 'भारत' या शीर्षकामुळे भावना दुखावत असल्याचा दावा करत एका व्यक्तीनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्यानुसार 'भारत’ शब्दाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नसून हे या कायद्याचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले गेले होते.

याशिवाय चित्रपटातील एक डायलॉग वगळण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. या डायलॉगमध्ये सलमान आपल्या भारत नावाची तुलना देशासोबत करताना दिसतो. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगित देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत केली होती. यावर निर्णय देत दिल्ली उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली असून हा चित्रपट ५ जूनलाच प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.