ETV Bharat / sitara

शकुन बत्राच्या चित्रपटात फिटनेस इन्स्ट्रक्टरच्या भूमिकेत दीपिका पदुकोण? - शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पदुकोण

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. यात दीपिकाची कोणती भूमिका आहे यावर मनोरंजन जगतात उत्सुकता तयार झाली आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By

Published : Apr 28, 2021, 9:16 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माते शकुन बत्राचा आगामी चित्रपटात (शीर्षक अद्याप ठरलेले नाही) दीपिका पदुकोणसोबत नव्या पिढीतील कलाकार सिध्दांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

एका वेबसाइटवर आलेल्या वृत्तानुसार, दीपिकाने या चित्रपटात फिटनेस इन्स्ट्रक्टरची भूमिका साकारली आहे. सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनरची ही प्रेरणादायी कथा असल्याचे सांगितले जाते. परंतु चित्रपटाशी संबंधीत व्यक्तीने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात अनुभवी कलाकारांसोबत नवोदित कलाकारांचा समावेश आहे. अनन्या पांडेला दीपिकासोबत काम करण्याबद्दल दडपण आहे का असे विचारले असता ती म्हणाली, "मुळीच नाही. ती (दीपिका) सर्वात सुंदर आहे. बाहेरून ती जितकी सुंदर आहे, तितकीच ती आतूनही सुंदर आहे. आजवरच्या सर्वांत छान आणि प्रेमळ व्यक्तींपैकी ती एक आहे. ती अक्षरशः माझ्या बहिणीसारखी आहे. आमचे खरोखर चांगले संबंध आहेत. "

दीपिकावर कौतुकाचा वर्षाव करीत अनन्या म्हणाली की ती सेटवरील सहकलाकारांना आरामदायक वाटण्यासाठी चांगले काम करते. आम्ही एकत्र वर्कशॉप केले आहेत. ती खूप काळजी घेणारी व्यक्ती आहे, असे ती पुढे म्हणाली.

हेही वाचा - २० बेडचे कोविड रुग्णलय उभारणीसाठी अजय देवगणने केली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.