ETV Bharat / sitara

ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण 'फाइटर' चित्रपटात येणार एकत्र - ह्रतिकच्या वाढदिवशी चित्रपटाची अधिकृत घोषणा

हृतिक रोशन स्टारर 'फाइटर' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. उद्या निर्माता ह्रतिकच्या वाढदिवशी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहेत.

Hrithik Roshan in Fighter
ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण
author img

By

Published : Jan 9, 2021, 7:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन आगामी 'फाइटर' चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दीपिकाच्या वाढदिवशी ह्रतिकने शुभेच्छा संदेश दिल्यानंतर त्याला उत्तर देताना जी प्रतिक्रिया तिने दिली होती, त्यावरुन त्यांच्या एकत्र येण्याचा अंदाज बांधला जात होता.

एका अग्रगण्य वेबसाईटनुसार, ह्रतिकची मुख्य भूमिका असलेल्या आगामी सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रपटात दीपिका पदुकोण काम करणार आहे. यातील तिची व्यक्तीरेखा काय असेल हा भाग गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात दोघेही श्वास रोखून धरणारे चित्तथरारक अ‍ॅक्शन सिक्वन्स करताना दिसतील.

दीपिका पादुकोणने आपला ३५ वा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा केला. यावेळी ह्रतिकने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ह्रतिकच्या शुभेच्छाला उत्तर देताना जे दीपिकाने लिहिले त्यावरुन दोघे लवकरच स्क्रिन स्पेश शेअर करील असा तर्क काढण्यात आला होता.

ह्रतिक रोशनने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाला उत्तर देताना दीपिकाने लिहिले की, "खूप आभारी आहे ह्रतिक! आता काही दिवसात आणखी एक मोठे सेलेब्रिशन होणार आहे...!" दीपिकाच्या या ट्विटमुळे दोघेही एका चित्रपटात काम करतील असा तर्क लावण्यात येत होता.

'फाइटर' चित्रपटाची कथा ही सिद्धार्थ यांच्याकडे गेली दोन वर्षे होती आणि लढाऊ विमानांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन थ्रिलरची ही कल्पना सांगितली तेव्हा हृतिकने या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शविली होती.

हेही वाचा - दीपिका पदुकोण आणि ह्रतिक आगामी चित्रपटात एकत्र झळकणार?

'बँग बँग' आणि 'वॉर' चित्रपटानंतर हृतिक आणि सिद्धार्थच्या तिसर्‍यांदा एकत्र काम करणार आहेत. एरियल अॅक्शन थ्रीलर म्हणून शूट होणऱ्या या चित्रपटाचे काम डिसेंबर २०२१ मध्ये फ्लोअरवर सुरू होईल.

हेही वाचा - शिल्पा शिरोडकर बनली कोरोनाची लस घेणारी पहिली भारतीय सेलेब्रिटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.