मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आतापर्यंत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दीपिका तिच्या निवडलेल्या व्यक्तीरेखा उत्तमपणे सादर करते आणि हेच तिच्या यशाचे आणि वाढत्या चाहत्यांच्या संख्येचे रहस्य आहे. येत्या वर्षभरात दीपिका बर्याच महत्त्वाच्या चित्रपटात दिसणार आहे, ते चित्रपट खालीलप्रमाणेः
१. शकुन बत्राचा आगामी चित्रपट
सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत दीपिका या चित्रपटात दिसणार आहे. शूटिंग दरम्यान दोघांनी एकत्र खूप मजा केली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावरुन समोर आली आहेत. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह असल्याचे पाहायला मिळाले आहे.
२. पठाण
या चित्रपटात दीपिकासोबत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आहे. यापूर्वी दोघेही 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये एकत्र दिसले होते. प्रेक्षकांनी चित्रपटातील त्यांच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीचे कौतुक खूप केले होते. पठाणच्या काही भागांचे विदेशातही शूटिंग करण्यात आले असून स्क्रिप्टमध्ये दोघांचे अॅक्शन सीक्वेन्सही आहेत.
३. नाग अश्विनचा आगामी चित्रपट
या चित्रपटात अनेक बडे कलाकार आहेत. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन, सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट स्काय-फाय वर आधारित असेल आणि दीपिका या चित्रपटातून आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
हेही वाचा -प्रियंका चोप्रा पती निकसह लंडनमध्ये घालवतेय ख्रिसमसची सुट्टी
४. द इंटर्न
दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी 'द इंटर्न' चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन प्रक्रियेत पूर्णपणे मग्न आहे. 'द इंटर्न' च्या मूळ चित्रपटामध्ये रॉबर्ट डी निरो आणि अॅनी हॅथवे यांनी अभिनय केला होता. यापूर्वी रॉबर्ट डी निरोची भूमिका दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी साकारली होती.
५. महाभारत
हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज होईल, ज्यामध्ये दीपिका द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटही सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. द्रौपदीच्या भूमिकेत दीपिकाला पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतीक्षा करीत आहेत.
हेही वाचा -बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर बनणार बायोपिक