मुंबई - 'पीकू'सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट केल्यानंतर बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र येणार आहेत. हॉलिवूड फिल्म 'इंटर्न' च्या हिंदी रुपांतरात चित्रपटात दोघेही पुन्हा स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.
'इंटर्न' च्या हिंदी रिमेकमध्ये दीपिका आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार होत्या. त्यानंतर ऋषी कपूर यांचे निधन झाल्याने दुसऱ्या कलाकाराचा शोध निर्मात्यांनी सुरू केला होता. हा शोध अमिताभ यांच्या नावावर येऊन थांबला होता. मूळ 'इंटर्न' चित्रपटात रॉबर्ट डी निरो यांनी साकारलेली भूमिका हिदी रिमेकमध्ये अमिताभ साकारणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिलीय. अमिताभसोबत काम करण्यासाठी ती पुन्हा उत्सुक झाली आहे.
इंटर्न बद्दल बोलताना दीपिकाने आधी शेअर केले होते की हा चित्रपट एक इंटिमेट, रिलेशनशिप-आधारित ड्रामा आहे. "मला विश्वास आहे की चित्रपटाची कथा सध्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी अगदी संबंधित आहे. मी एका संघर्षशील विनोदी चित्रपटाच्या शोधात होते आणि ही कथा त्यात योग्य बसते. मी हा प्रवास सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही," असे पादुकोण म्हणाली होती.
हेही वाचा - मकरंद अनासपुरे दिग्दर्शित "काळोखाच्या पारंब्या"ला मास्को फिल्म फेस्टीव्हलमध्ये नामांकन